Type Here to Get Search Results !

NCB कार्यालयात आला तेव्हा आर्यनच्या हातात होते 'हे' पुस्तक; चर्चा तर होणारच

मुंबई: प्रकरणी जामिनावर सुटका झाल्यानंतर अभिनेता याचा मुलगा याने आज हायकोर्टाने घातलेल्या अटीनुसार एनसीबीच्या मुंबई कार्यालयात हजेरी लावली. यावेळी आर्यनच्या हातात असलेल्या एका पुस्तकावरून आता चर्चा रंगली आहे. ( ) वाचा: क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यनला ३ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर २६व्या दिवशी त्याला मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आणि ३० ऑक्टोबर रोजी त्याची आर्थर रोड कारागृहातून सुटक झाली. हायकोर्टाने जामिनावर असताना दर शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत एनसीबीच्या मुंबई कार्यालयात हजेरी लावण्याची अट घातली आहे. या अटीचे पालन करत आर्यन आज दुपारी कार्यालयात हजर झाला. आर्यन खान हा शाहरुखचा बॉडीगार्ड रवी सिंह याच्यासह एनसीबी कार्यालयात आला. मन्नत ते या प्रवासात तो एक सायकॉलॉजिकल थ्रिलर वाचत होता, हेसुद्धा स्पष्ट झाले आहे. आर्यन कारमधून उतरला तेव्हा त्याच्या हातात पुस्तक दिसले. फोटो झूम करून पाहिला असता 'द गर्ल विथ द ड्रॅगन टॅटू' असे नाव त्यावर दिसत आहे. आर्यनच्या हातातील या पुस्तकामुळे त्यावरूनही आता चर्चा रंगू लागली आहे. त्यातून आर्यन कोणत्या मानसिकतेतून सध्या जात आहे, याचे कयासही लावले जाऊ लागले आहेत. विशेष म्हणजे आर्यन एनसीबी कार्यालय येथे पोहचला तेव्हा त्याला गराडा पडला. मात्र, अत्यंत शांतपणे गर्दीतून वाट काढत आर्यन कार्यालयात पोहचला. कार्यालयात जाताना वा तिथून निघताना आर्यनने मौन बाळगले. माध्यमांनी त्याची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला पण आर्यन काहीही न बोलता तिथून निघाला. वाचा: पुस्तक आहे चर्चेतलं... 'द गर्ल विथ द ड्रॅगन टॅटू' हे स्वीडिश लेखक स्टीग लार्सन यांचे पुस्तक आहे. याच नावाने एक चित्रपटही बनवण्यात आलेला आहे. त्यात जेम्स बाँडपटांतील नायक डॅनियल क्रेग तसेच अभिनेत्री रूना मारा यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. याशिवाय अनेक अकादमी पुरस्कारांसाठीही चित्रपटाचे नामांकन झाले होते. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3BQlcyp

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.