Type Here to Get Search Results !

mahavikas aghadi: 'हे तर दुसऱ्याच्या ताटात तोंड घालणारे मांजर'; भाजप खासदाराने महाविकास आघाडीला दिली उपमा

अहमदनगर: ‘बंगालच्या निवडणुकीत () यांचे सरकार विजयी झाले की हे फटाके फोडतात. केंद्र सरकारचे कृषी कायदे रद्द झाले तरीही हे फटाके फोडून आनंद उत्सव साजरा करतात. आपले अपयश झाकण्यासाठी दुसऱ्याच्या ताटात तोंड घालणारे हे मांजर आहे,’ अशी उमपा भाजपचे खासदार यांनी महाविकास आघाडीला दिली. (bjp mp criticizes mahavikas aghadi govt) अहमदनगरच्या केडगाव उपनगरात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात खासदार विखे पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारसोबतच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्यावर नामोल्लेख टाळून टीका केली. क्लिक करा आणि वाचा- डॉ. विखे पाटील म्हणाले, ‘महाराष्ट्राचे जाणते राजे म्हणून मिरवणाऱ्या नेत्यांनी राज्याचे वाटोळे केले. आपले अपयश झाकण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा अटापिटा सुरू आहे. बंगालमध्ये ममता बॅनर्जी जिंकल्या, मोदींचा अहंकार तुटला, कृषी कायदे मागे घेतले मोदींचा अहंकार तुटला असे म्हणत महाविकास आघाडीचे सरकार आनंद उत्सव साजरा करते. मात्र आपल्या राज्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात त्यांना यशस्वी तोडगा काढता येत नाही. आपले हे अपयश झाकण्यासाठी दुसऱ्यांचे आनंद साजरे करणाऱ्या या सरकारला दुसऱ्याच्या ताटात तोंड घालणारे मांजर हीच उपमा शोभते,’ असेही विखे पाटील म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- केडगाव येथील भारतीय खाद्य निगम शखेत आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ. विखे पाटील बोलत होते. ते म्हणाले,‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना सुरू करून करोनाच्या काळामध्ये गरीब जनतेला धान्य पुरवठा करून कोणालाही उपाशी ठेवले नाही. मी खासदार असेपर्यंत नगर जिल्ह्यात रेशन मध्ये होत असलेला काळाबाजार खपून घेणार नाही. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री हे कर्तव्यशून्य असल्याने जनतेला राज्यातील योजनांचा लाभ मिळत नाही. मात्र केंद्र सरकारच्या योजना सुरूच राहणार आहेत. या योजनेचा लाभ खर्‍या अर्थाने लाभार्थ्यांना होणे गरजेचे आहे यासाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्यात,’ असेही ते म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- यावेळी नगरसेवक मनोज कोतकर, नगरसेवक राहुल कांबळे, नगरसेवक स्वप्नील शिंदे, भारतीय खाद्य निगचे अधिकारी बी.एम.राऊत, जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी,नगरसेवक स्वप्नील शिंदे,अविनाश दाभाडे,गणेश नन्नवरे,जालिंदर कोतकर,रमाकांत गाडे,बच्चन कोतकर,नगरसेवक योगीराज गाडे उपस्थित होते.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3cRok3a

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.