Type Here to Get Search Results !

माणगावजवळ खासगी बसचा भीषण अपघात; चालक ठार, ३५ हून अधिक जखमी

माणगाव: रायगड किल्ला दर्शन करुन माणगाव कडे येणाऱ्या एका खाजगी बसला गंभीर अपघात होऊन चालक ठार झाला असून यात ३५ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या जखमींपैकी १५ प्रवासी गंभीर असून त्यांना अलिबाग जिल्हा रुग्णालय आणि मुंबई येथे हलवण्यात आले आहे. जखमींमध्ये लहान मुले आणि महिलांचाही समावेश आहे. विजय भगवान नांगरे असे मृत चालकाचे नाव आहे. (the driver of a private bus lost life and more than 35 passengers were injured in a tragic accident near mangaon in raigad district) रायगड किल्ल्यावरुन पाचाड मार्गे निजामपुर - माणगाव कडे येताना डोगंराळ भागातीव अवघड वळणाचा हा रस्ता आहे. तीव्र उतार असलेल्या या मार्गावर अवघड वळण उतराताना झाला अपघात. या भीषण अपघातातील अन्य जखमींवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. साई ट्रँव्हलची ही खासगी बस होती. ही बस रायगड किल्ल्यावरुन माणगाव व निजामपुर कडे जाणाऱ्या मार्गावरील अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने कलंडली. चालक विजय नागरे (वय २४) हा अहमदनगरचा रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. ही बस ४० प्रवासी घेऊन पहाटे ३ वाजता कर्जतहून रायगडला निघाली होती.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xs9qKb

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.