Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री ठाकरे यांची प्रकृती स्थिर; CMOने दिली ही महत्त्वाची माहिती

मुंबई: यांच्या प्रकृतीबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून आज अधिकृत माहिती देण्यात आली आहे. झाली असून ते सध्या फिजिओथेरपी घेत आहेत, असे नमूद करतानाच त्यांची प्रकृती स्थिर असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. (CM ) वाचा: मुख्यमंत्री यांना मणक्याचा त्रास जाणवत होता. त्यामुळे निदानाअंती शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला होता. मुंबईतील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर दोन ते तीन दिवसांत मुख्यमंत्र्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल, असे सांगण्यात येत होते. मात्र मुख्यमंत्र्यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला आहे. याबाबत आज मुख्यमंत्री कार्यालयाने अपडेट्स दिले आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या मणक्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. सध्या ते फिजिओथेरपी घेत आहेत. त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्यवेळी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून नमूद करण्यात आले आहे. वाचा: दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे यांना अजून रुग्णालयातून डिस्जार्ज मिळालेला नसल्याने प्रामुख्याने विधिमंडळाचे पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होणार होते मात्र त्याऐवजी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अधिवेशन घेण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्यमंत्री अनिल परब, शिवसेना विधिमंडळ गटनेत एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील, काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात हे विरोधी पक्षनेते यांच्याशी याबाबत चर्चा करणार असल्याचे कळते. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CDhDMf

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.