Type Here to Get Search Results !

धक्कादायक! हिंगोलीच्या BSF जवानाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या, पत्नी आणि दोन मुलं पोरकी

हिंगोली : हिंगोलीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हिंगोली येथील अरुण सखाराम कवाने हे गुजरातमध्ये भुज मुंद्रा येथे बीएसएफ बटालियन १८ मध्ये हेड कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते. त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची दुःखद घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस यासंबंधी अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, २३/११/२०२१ रोजी त्यांनी हे धक्कादायक पाऊल उचललं. आज शहरातील आदर्श कॉलेज जवळील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. अरुण कवाणे यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं असा परिवार आहे. १९९९ मध्ये त्यांनी बीएसएफ फोर्स जॉईन केली होती. शहरातील संमती नगर त्यांचे कुटुंब वास्तव्यास होते. रात्री त्यांच्या कुटुंबियांच्या त्यांचे पार्थिव देण्यात आले होते. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून अरुण यांनी आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल का उचललं? याबद्दल पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3p0YAGV

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.