Type Here to Get Search Results !

शिवसेनेचा भाजपला आणखी एक धक्का; आता शिंदेंनी केला 'करेक्ट कार्यक्रम'

कल्याण: शिवसेनेने आगामी महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली असून नगरविकासमंत्री व विधिमंडळ गटनेते यांनी आज भाजपला पहिला धक्का दिला. डोंबिवलीतील भाजपच्या तीन माजी नगरसेवकांनी आज भाजपला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिंदे यांनी या तिन्ही माजी नगरसेवकांचे पक्षात स्वागत केले. ( ) वाचा: राज्यात मुंबईसह प्रमुख महापालिकांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर सगळेच राजकीय पक्ष सक्रिय झाले असून निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी आणि जुळवाजुळव सुरू झाली आहे. त्यात आज शिवसेनेने कल्याण डोंबिवलीच्या पिचवर भाजपला जोरदार धक्का दिला. भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक ,सायली विचारे आणि सुनीता पाटील यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांनी तिघांच्याही हातावर शिवबंधन बांधत त्यांचे पक्षात स्वागत केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही आज शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी महापौर विनिता राणे, कल्याण शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे उपस्थित होते. वाचा: दरम्यान, कल्याण डोंबिवलीतील भाजपचे पाच विद्यमान नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार, अशी चर्चा होती. मात्र आज प्रत्यक्षात एकाही विद्यमान नगरसेवकाने भाजपची साथ सोडली नाही. तरीही भाजपचे तीन माजी नगरसेवक गळाला लावून शिवसेनेने पहिला धक्का दिला आहे. येत्या काळात पक्षात आणखीही इनकमिंग होईल, असे दावे केले जात आहेत. दुसरीकडे मुंबईतही शिवसेना लवकरच भाजपला मोठा धक्का देणार असल्याचे सांगितले जात आहे. डिसेंबर महिन्यात भाजपचे मुंबईतील १५ ते २० नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करतील, असा दावा शिवसेनेचे मुंबई पालिकेतील नेते यांनी केला आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3oQQ2lZ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.