विजयसिंह होलम । अहमदनगर पोलिस दलात फौजदारपदी (पोलिस उपनिरीक्षक) कार्यरत असलेले संदीप भगवान फुंदे (मूळ रा. फुंदेटाकळी ता. पाथर्डी) यांना पाथर्डीत मारहाण करण्यात आली. हल्लेखोरांनी त्यांच्याकडील १७ हजार रुपये हिसकावून नेले. पोलिस ठाण्यात फुंदे यांच्या फिर्यादीवरून नऊ जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकी पार्किंग करताना धक्का लागल्याचे निमित्त झाले आणि ही घटना घडली. मुंबई पोलिस दलात कार्यरत संदीप फुंदे मुळेचे पाथर्डी तालुक्यातील फुंदे टाकळी येथील आहेत. सुट्टीवर ते गावी आले होते. पाथर्डी शहरात शेवगाव रस्त्यावर दुचाकी उभी करताना पाठीमागे असलेल्या मोटारीला फुंदे यांच्या वाहनाचा धक्का लागला. या कारणावरून मोटारीचा चालक आणि त्याच्या साथीदांरांनी फुंदे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्या खिशातील १७ हजार रुपये हिसकावून नेले, अशी फिर्याद फुंदे यांनी दिली. यावरून पाथर्डी पोलिसांनी ज्ञानदेव कोंडीराम केळगंद्रे, प्रकाश नामदेव केळगंद्रे, सचिन गोरख केळगंद्रे, अक्षय ज्ञानदेव केळगंद्रे (सर्व रा. पागोरी पिंपळगाव ता. पाथर्डी), राहुल बापुराव त्र्यंबके, लतीफ शेख (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) व तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत डांगे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. हेही वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lmT7cB