Type Here to Get Search Results !

कापूस व्यापाऱ्याची आत्महत्या, सुसाइड नोट लपवल्याचा पोलिसांवर आरोप

विजयसिंह होलम । शेतकरी आणि एसटी कामरागारांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू असताना शेवगावमध्ये एका तरुण कापूस व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. (वय २५ ) असे त्याचे नाव आहे. या व्यापाऱ्याने तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे मंगळवारी सकाळी उघड झाले. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तेथे आलेल्या गावकऱ्यांनी पोलिसांना धारेवर धरले. सुसाइड नोट होती की नव्हती, यावरून चर्चा सुरू आहे. तालुक्यातील नजीकबाभूळगाव येथे राहणारा भाऊसाहेब घनवट हा तरुण कापसाचा व्यापारी आहे. आज सकाळी शेवगाव तहसिलदार कार्यालयाच्या प्रांगणात प्रवेशद्वाराजवळील लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याच्या आवस्थेत तो आढळून आला. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह खाली घेण्यात आला. आत्महत्या करण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. वाचा: या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावकऱ्यांनीही तेथे धाव घेतली. आम्ही येण्याआधी मृतदेह खाली का घेतला? तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे का? ती कोठे आहे, या मुद्द्यांवर त्यांनी पोलिसांना धारेवर धरले. त्यामुळे त्याने चिठ्ठी लिहून ठेवली होती की नाही, याबद्दल अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही. त्यामुळे आत्महत्येचे कारणही समजू शकलेले नाही. यावरून शेवगाव तसेच नजीकबाभूळगाव ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू आहे. पोलिसांनीही यासंबंधी अद्याप अधिकृतपणे माहिती दिलेली नाही. पोलिसांच्या मते सुसाइड नोट नव्हती, तर ग्रामस्थांचा सुसाइड नोट असल्याचा व जाणीवपूर्वक लपविली जात असल्याचा आरोप आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3o45QCD

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.