Type Here to Get Search Results !

पवारांकडून गडकरींचं तोंडभरून कौतुक; फडणवीसांबद्दल म्हणाले...

नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी आज केंद्रीय मंत्री यांचं पुन्हा एकदा जाहीरपणे कौतुक करताना माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते यांच्यावर निशाणा साधला. त्यामुळे पवार यांचा विदर्भ दौरा पहिल्याच दिवशी लक्षवेधी ठरला आहे. ( ) वाचा: शरद पवार चार दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. आजपासून त्यांचा दौरा सुरू झाला. या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी आज येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज्य आणि देशातील विविध घडामोडींबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर पवार यांनी मते मांडली. राज्यातील काही शहरांत नुकत्याच हिंसाचाराच्या घटना घडल्या. त्यावर पवार यांनी परखड भाष्य केले. ' राज्यातील घटनेचे पडसाद उमटून अमरावती, नांदेड आणि मालेगावमध्ये काही समस्या उद्भवली. घटना कुठलीही असो त्यावर अशी प्रतिक्रिया उमटणे योग्य नाही. हिंसेच्या घटना घडवण्यासाठी कायदा हातात घेणे योग्य नाही. काही लोकांनी कायदा हातात घेतला. अशा लोकांवर कठोर कारवाई केली गेली पाहिजे', असे पवार म्हणाले. वाचा: हिंसाचारासारख्या घटनांचा सर्वात वाईट परिणाम हा व्यवसाय आणि उद्योगांवर होतो. या दोन्ही क्षेत्रांचा दंगलीशी काहीही संबंध नाही, मात्र सर्वाधिक फटका त्यांना सहन करावा लागतो, असे सांगताना ज्यांची दुकानं फोडली त्यांचा काय दोष? त्रिपुरातील घटनेत व्यापाऱ्यांचा काय दोष?, असा सवाल पवार यांनी केला. हिंसक घटनांमध्ये दुकानांचं नुकसान झालं तर प्रभावित झालेल्या व्यापारी आणि उद्योजकांना मदत देण्यासाठी सरकारने काही धोरण तयार करण्याची गरज आहे, अशी अपेक्षाही पवार यांनी व्यक्त केली. नागपूर महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचे घटक पक्ष एकत्र लढणार का हे आत्ताच सांगता येणार नाही. पण आघाडी केलेले पक्ष एकत्र लढले तर नक्कीच फायदा होईल, असे मला वाटते, असे उत्तर एका प्रश्नावर पवार यांनी दिले. गडकरींचं कौतुक, फडणवीसांवर निशाणा शरद पवार यांनी यावेळी नितीन गडकरी यांचं कौतुक केलं तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. 'राज्य चालवण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. राज्य चालवण्याची संधी मिळते तेव्हा मुख्यमंत्र्यांना पूर्ण राज्याकडे पाहावं लागतं. पण मुख्यमंत्री ज्या भागातून आला त्या भागाकडे जास्त कल असतो. विदर्भातील माजी मुख्यमंत्र्यांनी व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवायला हव्या होत्या', असे नमूद करत पवार यांनी अप्रत्यक्षपणे फडणवीसांना लक्ष्य केले. समस्या काय आहे ती पाहून सोडवायची असते, पक्ष पाहून नाही. पण असे फार कमी नेते उरले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे असे व्यक्तिमत्व आहे की विकासकामे करताना ते पक्ष पाहत नाहीत. त्यांच्यासमोर समस्या आल्या की त्याचा तोडगा ते काढतात, असे कौतुकोद्गार पवार यांनी काढले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Dr7gMZ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.