Type Here to Get Search Results !

महाराष्ट्रातील या नेत्यांचीच चौकशी का?; पवारांचा भाजपवर सर्वात मोठा आरोप

नागपूर: 'महाराष्ट्रातील सत्ता गेल्याने अस्वस्थ झालेले येथील भाजपवाले सत्ता पक्षातील नेत्यांच्या याद्या केंद्राकडे पाठवतात आणि केंद्र सरकार त्यांच्यामागे तपास यंत्रणेचा ससेमिरा लावते', अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष यांनी आज केली. ( ) वाचा: राष्ट्रवादी पक्षातर्फे वर्धमाननगरातील सातवचन लॉन्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्नेहमिलन सोहळ्यात पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना शरद पवार बोलत होते. यावेळी माजी गृहमंत्री यांची अटक, यांची ईडी चौकशी, यांच्या बहिणीच्या घरावर पडलेले छापे, हसन मुश्रीफांवरील आरोप, संजय राऊत यांच्या पत्नीची चौकशी यावरून पवार यांनी भाजप आणि केंद्र सरकारला लक्ष्य केले. महाराष्ट्रातील सत्ता गेल्याच्या अस्वस्थतेतून हे सगळं चालले असल्याचा आरोप पवार यांनी केला. ‘ज्या माणसाने आयुष्याची ३० ते ३५ वर्ष भाजपचं काम निष्ठेने केलं. विधीमंडळात पक्षाची भूमिका मांडली अशा माणसावर भाजपने अन्याय केला. त्यांच्या मागे तपास यंत्रणा लावण्याचे प्रयत्न केले जात आहेत,' असे नमूद करत एकनाथ खडसे यांच्या ईडी चौकशीवर पवार यांनी टीकास्त्र सोडले. अल्पसंख्याकांचे नेतृत्व करणाऱ्या हसन मुश्रीफ सारख्या माणसाला त्रास दिला जातोय. अजित पवारांना लक्ष्य केले जाते. ते बधत नाही हे बघून त्यांच्या बहिणीला त्रास दिला जातो. त्यांच्या घरी वीस वीस माणसं येऊन झडती घेतात. तासंतास ठाण मांडून बसतात. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याबाबत काही करता येत नसल्यामुळे त्यांच्या पत्नीला चौकशीस बोलावले गेले, असे नमूद करत तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याबद्दल पवार यांनी सडकून टीका केली. वाचा: ज्या पोलीस आयुक्तांनी अनिल देशमुखांवर आरोप केले ते आज कुठे आहेत, हे कुणालाच माहिती नाही. कोर्टाने त्यांना फरार म्हणून घोषित केले आहे. असा माणूस आज बाहेर फिरतो आहे आणि केंद्र सराकरने अनिल देशमुखांना तुरुंगात टाकले आहे. देशमुखांच्या प्रत्येक दिवसाची, प्रत्येक तासाची किंमत जनता तुमच्याकडून वसूल करेल, असा इशारा पवार यांनी दिला. मी नेहमी विदर्भात आलो की अनिल देशमुख असायचे. हा माझा विदर्भाचा असा पहिला दौरा आहे ज्यात अनिल देशमुखांची कमी जाणवते. त्यांना देण्यात आलेली प्रत्येकी जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली आहे. सध्याचं केंद्र सरकार एखाद्या राज्यात सत्ता न मिळाल्यास केंद्रातील सत्तेचा गैरवापर करून त्या राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने करते. राज्यात भाजपच्या हातून सत्ता गेल्याने ते अस्वस्थ झालेत. सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षातील नेत्यांच्या मागे केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या तपास यंत्रणा लावून त्यांना अस्थिर करण्याचा प्रयत्न केंद्र करीत आहे, असा आरोपही पवार यांनी केला. देशमुखांवर आरोप झाले तेव्हा ते माझ्याकडे आले. आरोपांची शहनानिशा होईपर्यंत मी सत्तेत राहत नाही, असे त्यांनी मला सांगितले आणि स्वाभिमानाने त्यांनी राजीनामा दिला. अनिल देशमुख यांचा दोष काय? हे मला समजत नाही, अशी खंत पवारांनी व्यक्त केली. पटेलांचा नाना पटोलेंवर निशाणा शरद पवारांच्या आशीर्वादाने अनिल देशमुख नक्कीच बाहेर येतील, असे मत यावेळी उपस्थित असलेले प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले. येणाऱ्या महापालिका निवडणुका आपण पूर्ण ताकदीनिशी लढवू. विधानसभेतसुद्धा यंदा आपण शहरात किमान दोन मतदारसंघ लढवू आणि ग्रामीण भागातसुद्धा आपण हिंगणा आणि काटोलखेरीज इतर ठिकाणी आपली ताकद दाखवून देऊ, असा विश्वास पटेल यांनी व्यक्त केला. आजकाल लोकं स्वबळाची भाषा करीत आहेत. आपणसुद्धा स्वबळावर लढण्याची तयारी ठेवायला हवी. गरज पडल्यास सगळ्या जागा लढवू, या शब्दांत पटेलांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे नाव घेता त्यांचा समाचार घेतला. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ckhFhB

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.