Type Here to Get Search Results !

बेनामी संपत्तीबद्दल बोलायला लावू नका, नाहीतर... मलिक यांचा अमृता फडणवीसांना इशारा

मुंबई: अंडरवर्ल्ड कनेक्शन व ड्रग्ज प्रकरणी () यांच्यावर आरोप करणारे विरोधी पक्षनेते () यांच्या विरोधात मलिक यांनी आरोपांची माळच लावली आहे. देवेंद्र फडणवीस यांचेच ड्रग पेडलरशी संबंध असल्याचा दावा करणाऱ्या मलिक यांनी आज फडणवीसांचे अंडरवर्ल्डशी असलेले कनेक्शन समोर आणले. त्याचवेळी () यांनी केलेल्या बेनामी संपत्तीच्या आरोपांनाही त्यांनी सडेतोड उत्तर दिलं. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर सर्वप्रथम हल्लाबोल केला होता. तेव्हापासून आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालं आहे. वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली एनसीबीनं केलेल्या कथित बनावट कारवाया मलिक यांनी उजेडात आणल्या. त्यानंतर भाजप वानखेडेंच्या बाजूनं मैदानात उतरला. मलिक यांचे जावई ड्रग्ज प्रकरणात अडकल्यानंच ते प्रामाणिक अधिकाऱ्यावर आरोप करत असल्याचं भाजपनं म्हटलं. त्याला उत्तर देताना मलिक यांनी फडणवीस व त्यांच्या पत्नीचे ड्रग पेडलरशी संबंध असल्याचा दावा केला होता. तेव्हापासून मलिक विरुद्ध फडणवीस असा सामना रंगला आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या अमृता फडणवीस यांनी अलीकडंच मलिक यांच्यावर निशाणा साधला होता. बेनामी आणि काळी संपत्ती वाचवण्यासाठी नवाब मलिक लोकांवर आरोप करताहेत, असं अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या. त्यांनाही नवाब मलिक यांनी आज उत्तर दिलं. वाचा: 'ही कुठल्याही प्रकारची व्यक्तिगत लढाई नाही. माझी लढाई ही अन्यायविरुद्धची आहे. 'एनसीबी'मधील खंडणीखोरांच्या विरोधात व निर्दोष नागरिकांना अडकवणाऱ्यांच्या विरोधात ही लढाई आहे. मात्र, त्यांना वाचवण्यासाठी कोणी समोर येत असेल तर मला बोलावं लागणार,' असं मलिक म्हणाले. 'माझ्या जावयाविरुद्ध नेमकं काय प्रकरण आहे ते कोर्टाच्या जामीन आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे,' असंही त्यांनी सांगितलं. वाचा: 'कुठल्याही महिलेविरोधात मला काही बोलायचं नाही. हा बेमामी संपत्तीचा विषय नाही, पण ते काढायची वेळ आली तर तीही काढू. वरळीमध्ये दोन-दोनशे कोटी रुपयांचे फ्लॅट कोणाच्या नावावर आहेत? बीकेसीमध्ये कोणी फ्लॅट घेतलाय आणि तिथं कोण, कोणाच्या नावावर राहतोय? हेही काढता येईल. ते काढायचं असेल तर आम्हीही तयार आहोत. ईडी, सीबीआय, एनआयए ज्या कोणाकडून माझी चौकशी करायची असेल ती करा. पण मी दिलेल्या कागदपत्रांचीही चौकशी होईल याचं आश्वासन मला द्या,' असं आव्हान नवाब मलिक यांनी दिलं.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kqfA87

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.