Type Here to Get Search Results !

एसटी संप: अनिल परब-शरद पवारांमध्ये गोपनीय बैठक, मोठ्या निर्णयाची शक्यता

मुंबई: विलिनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या २० दिवसांपासून सुरू असलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) कामगारांच्या संपावर (MSRTC Strike) अद्यापही तोडगा निघालेला नाही. विलिनीकरण अशक्य असल्याचं सत्ताधारी नेत्यांकडून अप्रत्यक्षपणे सांगितलं जात असतानाच, आता नवी माहिती समोर आली आहे. संपाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात महत्त्वाची बैठक सुरू आहे. उपमुख्यमंत्री हे देखील बैठकीला उपस्थित असल्याचं समजतं. वरळीतील एका हॉटेलमध्ये ही बैठक सुरू असून त्यात संपाच्या बाबतीत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्या असल्या तरी विलिनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. विलिनीकरणाच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारनं समिती नेमली आहे. समितीच्या अहवालानुसार निर्णय घेऊ, असं परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. तोपर्यंत कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, असं आवाहन सरकारनं केलं आहे. कामगारांचं निलंबन आणि सेवासमाप्तीसारखी कारवाई देखील सरकारनं केली आहे. त्यानंतरही कामगार मागे हटण्यास तयार नाहीत. त्यामुळं पेच वाढला आहे. वाचा: एसटी कामगारांनी विलिनीकरणाची मागणी करणं म्हणजे मालक बदलण्याची मागणी करण्यासारखं आहे, असं पवारांनी यापूर्वीच सांगितलं आहे. अनिल परब यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशीही या संदर्भात चर्चा केली आहे. भाजपचे नेतेही आंदोलनात उतरले असून राज्य सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत. त्यातच राज्यभरातील कामगारांनी मुंबईत येऊन आंदोलनाची व्याप्ती वाढवावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवार व अनिल परब यांच्यात ही बैठक होत आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xbYEaP

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.