Type Here to Get Search Results !

विदर्भात भाजपला धक्का; बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

नागपूरः नागपूरातील भाजपचे नेते डॉ. रविंद्र उर्फ छोटू भोयर यांनी भाजपला रामराम करत काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे रेशीमबाग प्रभागाचे नगरसेवक डॉ. रवींद्र ऊर्फ छोटू भोयर यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत छोटू भोयर यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे. () विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छोटू भोयर पक्षावर नाराज असल्याची चर्चा होती. त्यामुळंच त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचा अंदाज बांधण्यात आला आहे. माजी उपमहापौर व भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक असलेले डॉ. भोयर काँग्रेसच्या संपर्कात होते. त्यांनी अलीकडेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतल्याने ते काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुक असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र, अद्याप काँग्रेसकडून त्यांना विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठी कुठलाही शब्द देण्यात आलेला नाही, असंही बोलले जात आहे. वाचा- डॉ. भोयर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक असण्यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशीही जुळले आहेत. त्यांच्या बंडखोरीच्या वृत्ताने भाजपमध्ये अस्वस्थता पसरली होती. त्यांनी त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करावा यासाठी भाजपकडून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्नदेखील सुरू होते. मात्र, डॉ. भोयर हे पक्षांतराच्या निर्णयावर ठाम होते. डॉ. भोयर यांनी सोमवारी सकाळी काँग्रेस कार्यालयात काँग्रेसचे नेते व राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत व काँग्रेसचे विदर्भातील नेते उपस्थित होते. डॉ. भोयर यांच्या पक्षांतराने भाजपला मोठा धक्का बसला आहे. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/30LJe0C

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.