Type Here to Get Search Results !

'आधी भारताच्या हद्दीत चीननं वसवलेलं गाव उखडा, ठाकरे सरकारचं नंतर बघू'

मुंबई: भारतीय जनता पक्षाच्या नुकत्याच झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत महाराष्ट्रातील सरकार बाबतही चर्चा झाली. हे सरकार उखडून फेका, असं आवाहन भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा () यांनी केलं. नड्डा यांच्या या वक्तव्याचा शिवसेनेचे खासदार () यांनी जोरदार समाचार घेतला आहे. राऊत यांनी भाजपशासित केंद्र सरकारला आव्हानच दिलं आहे. मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. नड्डा यांनी महाविकास आघाडी सरकारबद्दल केलेल्या वक्तव्याची राऊत यांनी खिल्ली उडवली आहे. त्यांच्या विधानाचा समाचार घेताना राऊत यांनी भाजपला भारत-चीन व भारत-पाकिस्तान सीमेवरील परिस्थितीची जाणीव करून दिली आहे. अरुणाचल प्रदेशात चिनी सैन्य घुसलं आहे. चीननं भारतीय हद्दीत गावं वसवली आहेत. ती गावं भाजपच्या सरकारनं आधी उखडून फेकावी. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले वाढले आहेत. दहशतवाद्यांचे अड्डे वाढले आहेत. ते ताबडतोब उखडून फेका, बाकीचं नंतर बघू,' असा सणसणीत टोला राऊत यांनी हाणला आहे. वाचा: 'लोकशाही देशात एखादं सरकार लोकशाही मार्गानं हटविण्याचा अधिकार दुसऱ्या पक्षाला आहे. पण उखडण्याची भाषा करत असाल तर सीमेवर चीनची जी लोकं घुसली आहेत आणि गावंच्या गावं वसवली आहेत. त्याचं काय करणार आहात, याची देशाला उत्सुकता आहे. त्यांना उखडून फेकल्यानंतर महाराष्ट्राकडं वळा आणि राजकीय उखडबाजी जरूर करा,' असं राऊत म्हणाले. 'महाराष्ट्रात प्रयत्न करूनही भाजपला आघाडीला किंचितही धक्का लावता आलेला नाही. केंद्रीय सत्ता, संपूर्ण केंद्रीय यंत्रणा हाताशी धरून दहशत, दबाव आणि पैशाचा वापर करूनही सरकार पडत नसेल तर वैफल्य येणं हे स्वाभाविक आहे. त्यांची भूमिका समजू शकतो,' असा चिमटाही त्यांनी काढला. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3keB3Rk

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.