Type Here to Get Search Results !

मोदीजी, आता तुम्हीच सांगा, आम्ही कुठल्या चौकात येऊ?; राष्ट्रवादीचा सवाल

मुंबई: केंद्रात सत्तेत आल्यानंतर भाजप सरकारनं घेतलेल्या काही मोठ्या निर्णयांपैकी नोटबंदीचा (Demonetisation) निर्णय संपूर्ण देश ढवळून काढणारा ठरला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या () या निर्णयाला आज पाच वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळं या निर्णयाच्या यशापयशाची चर्चा नव्यानं सुरू झाली आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी यावरून पंतप्रधान यांना लक्ष्य केलं आहे. भ्रष्टाचार, काळा पैसा व दहशतवाद संपवण्याची घोषणा करत भाजपनं २०१४ साली विक्रमी जागा जिंकून देशाची सत्ता ताब्यात घेतली. नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदी विराजमान झाले. पंतप्रधान मोदी यांच्याकडून देशवासीयांना मोठ्या अपेक्षा होत्या. सुरुवातीच्या कार्यकाळात अनेक धडाकेबाज निर्णय घेतले. त्यातील एक निर्णय जगभर गाजला. पाच वर्षांपूर्वी मोदी सरकारनं एका रात्रीत काही मोठ्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली. मोदी सरकारचा 'ऐतिहासिक निर्णय' असं या निर्णयाचं कौतुक केलं गेलं. काळ्या पैशावर हा 'सर्जिकल स्ट्राइक' आहे. यामुळं दहशतवाद्यांची रसद तुटेल, भ्रष्टाचाराला आळा बसेल, असं सांगितलं गेलं. खुद्द मोदी यांनी हा निर्णय देशहिताच्या दृष्टीनं महत्त्वाचा असल्याचं सांगितलं. वाचा: नोटबंदीमुळं त्यावेळी देशभरातील नागरिकांना मोठा त्रास झाला. नोटा बदलण्यासाठी बँकांबाहेर रांगा लागल्या. त्यात काही जणांचा मृत्यूही झाला. मात्र, भाजपकडून या निर्णयाचं समर्थन केलं जात होतं. 'मला फक्त तीन महिने द्या. माझा हा निर्णय चुकला तर कुठल्याही चौकात मला बोलवा आणि देश जी शिक्षा देईल, ती भोगायला तयार आहे,' असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते. वाचा: मोदींच्या त्याच वक्तव्याचा धागा पकडून आता विरोधक त्यांना प्रश्न विचारत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं मोदींना त्यांच्या या निर्णयाची आठवण करून दिली आहे. 'आज नोटाबंदीला पाच वर्षे पूर्ण झाली. ना काळा पैसा परत आला, ना भ्रष्टाचार संपला, ना दहशतवादी कारवायांना आळा बसला. मोदींनी तीन महिने मागितले होते, आता आम्ही कुठल्या चौकात यायचं हे त्यांनीच सांगावं,' असा खोचक टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/301GNGK

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.