Type Here to Get Search Results !

अण्णा हजारेंचे मेडीकल रिपोर्ट पाहून डॉक्टरही चकीत

अहमदनगरः ज्येष्ठ समाजसेवक () यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ते राळेगणसिद्धीत दाखल झाले असून पुढील आठवडाभर त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. मात्र, ८४ व्या वर्षीही हजारे यांचे मेडीकल रिपोर्ट पाहून डॉक्टरही चकीत झाले. या वयात एवढे नॉर्मल रिपोर्ट अभावानेच पहायला मिळतात, असे रुबी रुग्णालयाचे प्रमुख हृदयरोगतज्ज्ञ डॉ. परवेझ ग्रँट यांनी सांगितले. अण्णा हजारे नियमित वैद्यकीय तपासणीसाठी गुरूवारी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकला दाखल झाले होते. गुरूवारी त्यांच्या मुख्य तपासण्या करण्यात आल्या. उर्वरित तपासण्या आज शुक्रवारी सकाळी करण्यात आल्या. सर्व तपासण्यांचे अहवाल नॉर्मल आले. नियोजित सर्व तपासण्या पूर्ण झाल्याने डॉक्टरांनी अण्णांना राळेगणला जाण्यास परवानगी दिली. दरम्यान अण्णा रुग्णालयात दाखल झाल्याच्या बातम्या पसरल्यानंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह अनेक मान्यवरांनी दूरध्वनीद्वारे अण्णांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली. वाचाः अण्णांना रुग्णालयातून निरोप देण्यासाठी रुबी हॉल क्लिनिकची संपूर्ण टिम उपस्थित होती. डॉ. परवेझ ग्रँट, डॉ. मखळे, डॉ. मुनोत यांनी अण्णांच्या सर्व तपासण्या केल्या. या वयातही अण्णांची प्रकृती ठणठणीत आहे. या एखाद्या डॉक्टरांना सुद्धा या वयात आपली प्रकृती एवढी चांगली ठेवणे शक्य नाही, असे सांगत डॉक्टरांनी अण्णांचे कौतूक केले, त्यांचा दिनक्रम जाणून घेतला. इतरांनी त्यांचा आदर्श घेण्याच आवाहनही केले. अण्णा राळेगणसिद्धीमध्ये आले आहेत. मात्र, डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे पुढील एक आठवडा तरी कार्यकर्त्यांनी अण्णांना भेटण्याचा अग्रह करू नये, असे आवाहन हजारे यांच्या कार्यालयारतर्फे संजय पठाडे यांनी केले आहे. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xmPwQE

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.