Type Here to Get Search Results !

एसटी संप: अजित पवार भाजपवर भडकले; केला 'हा' गंभीर आरोप

अहमदनगर : ‘ स्थापना होऊन साठ वर्षे उलटून गेली आहेत, मात्र या महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याचा मुद्दा कधीच उपस्थित झाला नाही. आता कर्मचाऱ्यांना भडकावण्यासाठी भाजपकडून तो पुढे केला गेला आहे. इकडे एसटीसाठी हा मुद्दा लावून धरणाऱ्या राज्यातील भाजपच्या नेत्यांना केंद्र सरकारने ' 'चे खासगीकरण केलेले कसे चालते,’ असा थेट सवाल उपमुख्यमंत्री यांनी केला. ( Ajit Pawar On ) वाचा: आमदार यांच्या पुढाकारातून कर्जत तालुक्यामध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. वाचा: यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, ‘ एसटी कामगारांचे आंदोलन भाजपच्या वतीने जाणीवपूर्वक चिघळवले जात आहे. एसटीचे सर्व कर्मचारी आमचेच आहेत. त्यांच्या मागण्या आम्हालाही पटतात. सरकार याबाबत सकारात्मक आहे. असे असूनही विरोधी पक्षातील काही आमदार आंदोलनामध्ये सहभागी होऊन आंदोलकांना भडकवत आहेत. साठ वर्षांत कधीही एसटी विलीनीकरणाचा प्रश्न उपस्थित केला गेला नाही. मग आत्ताच कशामुळे हा प्रश्न उपस्थित केला जात आहे, हे आता सर्वांच्या लक्षात आले आहे. विरोधकांच्या राजकारणामध्ये एसटीच्या कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊ नये. केंद्र सरकारने एअर इंडियाचे खासगीकरण केले. केंद्रातील सरकार भाजपचे आहे. मग त्याच्या विरोधात राज्यातील नेते व सदर आमदार गप्प का आहेत? केंद्र सरकारने खासगीकरण केले तर चालते, मात्र आम्ही एसटीचे खासगीकरण करणार नसतानाही जाणीवपूर्वक एसटी कामगारांना भडकावून आंदोलन पेटविण्याचे काम ही मंडळी करीत आहेत,’ अशी टीका पवार यांनी केली. आर्थिक परिस्थिती पूर्ववत होतेय! सरकार व्यवस्था चालविताना अनेक अडचणी येतात. करोना, निसर्ग तसेच तौक्ते चक्रीवादळ, अतिवृष्टीमुळे आर्थिक विकास मंदावला होता. परंतु आता आर्थिक परिस्थिती पूर्ववत होत आहे. राज्यातील सर्व तालुक्यांत टप्प्याटप्प्याने प्रशासकीय इमारती बांधण्यात येतील. परंतु वीज व पाणी यासारख्या सार्वजनिक सुविधांच्या वापरामध्ये शिस्त आवश्यक आहे, असे अजित पवार म्हणाले. विकासकामांमध्ये अनेक अडचणी निर्माण होतात. मात्र सर्वांच्या सहकार्यानं त्यावर मात करण्यात येईल. विकासकामं करताना भेदभाव न करता सर्वांना निधी देण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kA8EFr

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.