Type Here to Get Search Results !

मुंबईत खळबळ उडवणारा 'तो' कॉल दुबईतून; तपासात वेगळीच माहिती उघड

मुंबई: आहे, अशी माहिती एका व्यक्तीने शनिवारी फोनवरून रेल्वे पोलिसांना दिली होती. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या माहितीची गंभीर दखल घेत शोधमोहीम सुरू करून सर्व यंत्रणांना सतर्कही करण्यात आले. दरम्यान, हा फोन करणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधला असता वेगळीच माहिती समोर आली असून घडवण्याचा कट ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. ( ) वाचा: आयुक्त यांनी बॉम्बस्फोटाच्या धमकीबाबत रात्री उशिरा ट्वीटरच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती दिली आहे. 'संभाव्य बॉम्बस्फोटाच्या धोक्याबद्दल आलेला फोनकॉल फसवा असल्याचे निदर्शनास आले आहे. फोन करणारी संबंधित व्यक्ती दुबई येथील रहिवासी आहे. तो तिथे त्यांच्या आईसोबत राहतो. त्याने गेल्या आठवड्यात गुजरातमधील गांधीनगर येथेही एका अधिकाऱ्याला फोन करून अशाच प्रकारची माहिती दिली होती. मुंबई लोहमार्ग पोलिसांचे या व्यक्तीच्या नातेवाईकांशीही बोलणे झाले असून आतापर्यंतच्या चौकशीनुसार या व्यक्तीची मानसिक स्थिती चांगली नसल्याचे स्पष्ट झाले आहे', असे खालिद यांनी सांगितले. या कॉलमधून दिलेल्या माहितीत काहीही तथ्य नाही व त्याला असे कॉल करण्याची सवयच असल्याचे स्पष्ट झाले असले तरी खबरदारी म्हणून पुढील चौकशी सुरू आहे, असेही त्यांनी नमूद केले. वाचा: दरम्यान, मुंबईत वांद्रे रेल्वे पोलिसांना आलेल्या या फोनने मोठी खळबळ उडाली होती. मुंबईत बॉम्बस्फोट घडवले जाण्याची शक्यता असल्याचे या व्यक्तीने सांगितले होते. त्यामुळे याबाबतचे गांभीर्य ओळखून खबरदारी म्हणून सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली. मुंबईतील सर्व संबंधित यंत्रणांनाही याबाबत अवगत करण्यात आले व सर्वांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या गेल्या. रात्री उशिरा ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kyGn2j

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.