Type Here to Get Search Results !

गडचिरोली पोलिसांनी करून दाखवलं; पोलिस अधीक्षकांनी कथन केला संपूर्ण थरार

गडचिरोली: पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत () हा नक्षलवादी कमांडर ठार झाला आहे. तेलतुंबडे हा एमएमसी झोनचा कमांडर होता. दंडकारण्य जसं त्यांचं राज्य आहे. तसंच एमएमसी झोन त्यांचं राज्य आहे. त्या राज्याचा तो प्रमुख होता. त्यामुळे पोलिसांचं यश फार मोठं असून त्याचा महाराष्ट्रालाच नाही तर मध्यप्रदेश आणि छत्तीसगडलाही मोठा फायदा झाल्याचं म्हटलं जात आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगाणा राज्यांना न जमलेलं काम गडचिरोली पोलिसांनी करून दाखवल्यानं गडचिरोली पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. (gadchiroli sp ankit goyal tells about the performance of the police against the naxals in gadchiroli) गडचिरोलीचे एसपी अंकित गोयल यांनी पोलिसांच्या या कामगिरीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गडचिरोलीत किमान १०० नक्षलवाद्यांशी चकमक उडाली होती. त्यात छत्तीसगडचेही काही नक्षलवादी होते. सी-६० कामांडोनी जोरदार हल्ला केल्याने २६ नक्षलवादी मारले गेले. तर बाकीचे नक्षलवादी पळून गेले. क्लिक करा आणि वाचा- तब्बल ९ तास सुरू होती चकमक गडचिरोलीत पोलिस आणि नक्षलवाद्यांची मोठी चकमक उडाली. त्यात २६ नक्षलवादी मारले गेले. डीआयजीच्या मार्गदर्शनाखाली हे ऑपरेशन पार पडलं. अपर पोलीस अधीक्षक समीर शेख,अपर पोलीस अधीक्षक अनूज तारे यांचं मार्गदर्शन लाभलं. तसेच सोमय मुंडे हे ग्राऊंडवर लीड करत होते. प्रचंड गोळीबार होऊन सुद्धा पोलीस आणि जवान लढले. आमच्याकडून मिळालेलं प्रत्युत्तर पाहून बाकीचे नक्षल पळून गेले. त्यांचा शोध घेत आहोत, असं अंकित गोयल यांनी सांगितलं. सकाळी ६ वाजता ही चकमक सुरू झाली. तब्बल ९ तासही चकमक सुरू होती, असं त्यांनी स्पष्ट केलं. क्लिक करा आणि वाचा- कॅम्पसाठी जमले होते ३०० नक्षलवादी गडचिरोलीत नक्षलवाद्यांचं कॅम्प सुरू होतं. त्यासाठी ३०० नक्षलवादी जमले होते. कशासाठी हे कॅम्प होतं माहीत नाही. त्या कॅम्पच्या ठिकाणी काही साहित्य मिळालं आहे. त्याचा अनुवाद केल्यानंतर अधिक माहिती मिळेल, असं सांगतानाच या ३०० नक्षलवाद्यांविरोधात आमचे १०० पोलीस आणि सी-६० तसेच स्पेशल ऍक्शन ग्रुपचे जवान लढले, असं त्यांनी सांगितलं. नक्षलवाद्यांची फायर पॉवर पाहता आणि ते ज्या आक्रमकपणे लढत होते ते पाहता किमान शंभर नक्षलवादी जंगलात होते हे दिसून येतं, असंही गोयल यांनी सांगितलं. क्लिक करा आणि वाचा- या चमकीत छत्तीसगडचे नक्षलवादीही ठार झाले आहेत. ते छत्तीसगडचे असले तरी महाराष्ट्रासाठी काम करत होते. गडचिरोलीत ऑपरेट करणारेच होते. गडचिरोलीत बाहेरून येणाऱ्या नक्षलवाद्यांची संख्या वाढत आहे. स्थानिक मुलांकडून त्यांना रिस्पॉन्स मिळत नाही. त्यामुळे ते बाहेरच्या मुलांची नक्षलवादी कारवायांसाठी भरती केली जात आहे, असंही गोयल यांनी सांगितलं.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qDtMic

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.