Type Here to Get Search Results !

शिवसेना-भाजप युती व्हावी अशी विक्रम गोखलेंची इच्छा; भाजप म्हणतो...

मुंबई: शिवसेना-भाजपनं पुन्हा एकत्र यायला हवं आणि त्यासाठी मी स्वत: पुढाकार घेईन, या अभिनेते () यांच्या वक्तव्यामुळं पुन्हा एकदा युतीची चर्चा सुरू झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष (Chandrakant Patil) यांनी गोखले यांच्या या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना अत्यंत महत्त्वाचं विधान केलं आहे. ब्राह्मण महासंघाच्या वतीनं पुण्यात झालेल्या सत्कारानंतर विक्रम गोखले यांनी रविवारी मीडियाशी संवाद साधला होता. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आठवण काढत, शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र यायला हवेत, असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. 'बाळासाहेबांच्या निधनानंतर राजकारणात जे खेळ चालू आहेत, ते विचित्र स्तरावर पोहचले आहेत. त्यात महाराष्ट्रातील माणूस भरडला जातोय. हे गणित चुकलेलं आहे हे सुधारायचं असेल तर भाजप आणि शिवसेना एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. इतरांनीही पुढाकार घ्यावा, असं त्यांनी म्हटलं होतं. वाचा: चंद्रकांत पाटील यांनी मात्र युतीची चर्चा फेटाळून लावली आहे. 'बाळासाहेबांवरचं आमचं प्रेम बेगडी नाही. बाळासाहेबांचं कर्तृत्व आणि श्रद्धेपोटी आमचं त्यांच्यावर प्रेम आहे. शिवसेना-भाजप एकत्र यावी हा त्यामागचा उद्देश नाही. शिवसेनेसोबत एकत्र यायची आमची इच्छा नाही. ज्याप्रमाणे त्यांचा व्यवहार आहे, त्यामुळं तर बिलकूलच नाही,' असं पाटील म्हणाले. 'मुंबईत रे रोडला माझं घर आहे. चारही बाजूला मुस्लिम वस्ती आहे. दंगल व्हायची तेव्हा शिवसैनिक आम्हाला १५ - १५ दिवस जवळच्या नारळवाडीमध्ये घेऊन जायचे. ती बाळासाहेबांची शिवसेना आता राहिलेली नाही. त्यामुळं आम्हाला शिवसेनेसोबत सरकार बनवायचं नाही आणि त्यांच्यासोबत निवडणुका लढवायच्या नाहीत,' असं पाटील यांनी स्पष्ट केलं. नेमकं काय म्हणाले होते विक्रम गोखले?


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wO3Zod

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.