Type Here to Get Search Results !

st workers strike: कोल्हापूर-सांगली रस्त्यावर 'मिरज-कोल्हापूर' एसटीवर अज्ञातांनी दगडफेक; चालक जखमी

कोल्हापूर: सांगली रस्त्यांवर मिरज कोल्हापूर एसटीवर अज्ञातांनी दगडफेक केली. त्यामध्ये एसटी चालक जखमी झाला असून घटनास्थळी पोलिस दाखल झाले. (Unidentified persons pelted stones on Miraj-Kolhapur ST on Kolhapur-Sangli road) राज्यात एसटी कर्मचाऱ्यांना शासनाच्या सेवेत सामावून घ्यावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात येत आहे. एसटी बंद असल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत. काही मार्गावर तुरळक एसटी वाहतूक सुरू आहे. आज रविवारी सायंकाळी मिरजेहून कोल्हापूरला एसटी बस येत होती. यावेळी कोल्हापूर सांगली रस्त्यांवर हातकणंगले तालुक्यातील हालोंडी गावाजवळ अज्ञातांनी एसटीवर दगडफेक केली. त्यामध्ये एसटीची पुढीच काच फुटली असून एसटी चालक जखमी झाला. क्लिक करा आणि वाचा- या दगडफेकीनंतर दगडफेक करणाऱ्या व्यक्ती मात्र पळून गेल्या. या घटनेची माहिती कळताच शिरोली एमआयडीसी आणि हातकणंगले पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. एसटी चालकावर हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले आहे. क्लिक करा आणि वाचा- जिल्ह्यातील सर्व आगारात एसटी सेवा बंद असून प्रवासी खासगी वाहनांचा वापर करत आहेत. पंढरपूरला कार्तिक एकादशीला जाणाऱ्या वारकऱ्यांना खासगी वाहने आणि रेल्वेचा आधार घ्यावा लागत आहे. आज रविवारी मध्यवर्ती बस स्थानकात एसटी कर्मचाऱ्यांनी सत्यनारायणाची पूजा घालून राज्य सरकारला सुबुद्धी यावे म्हणून साकडे घालण्यात आले. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/31PkCVd

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.