उद्धव गोडसे । सांगली 'आपली खुर्ची मजबूत आहे का? हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सारखं तपासून पहावं लागत आहे. मुख्यमंत्र्यांनीच शिवसेना पक्ष संपवायचं ठरवल्याचं दिसून येत आहे, अशी बोचरी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी केली. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या विजयी उमेदवारांच्या सत्कारप्रसंगी पेठनाका येथे ते बोलत होते. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजप राज्यात एक क्रमांकाचा पक्ष आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक भाजप कमळ चिन्हावरच लढवेल. स्थानिक पातळीवर जिल्हाध्यक्षांनी निर्णय घ्यायचा आहे. भाजपचे चिन्ह घराघरात पोहोचविण्यासाठी ताकदीने कामाला लागा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वाचा: कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या घरी जाण्याची पद्धत मी मोडून काढत आहे. जिल्हा बँकेत विजय झालेल्या पदाधिकार्यांचा सत्कार करण्यासाठी मी स्वतः आलो आहे. सांगलीत भाजप दमदार असल्याने पॅनेलचा आग्रह धरला. काहींनी पॅनेल न होण्याचा प्रयत्न केला. भाजप संघटितपणे महाविकास आघाडीच्या विरोधात उभी राहिली. राजकारणात काहीवेळा हवे ते घडत नाही. तरीही अल्पावधीत मिळालेले यश वाखाणण्याजोगे असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. वाचा: यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, शिवाजीराव नाईक, सी. बी. पाटील, सम्राट महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी पंडित दीनदयाळ उपाध्याय, वनश्री नानासाहेब महाडिक यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विजयी झालेले संग्राम देशमुख, राहुल महाडिक आणि सत्यजित देशमुख यांचा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rkjS5e