Type Here to Get Search Results !

धावत्या लोकलमधून मोबाईल हिसकावला; सराईत गुंडासोबत प्रवाशाची झटापट झाली अन्...

नवी मुंबई: मानखुर्द रेल्वे स्थानकावर शनिवारी पहाटे दिपक चंद्रकांत हिरे (२९) या तरुणावर चाकु हल्ला करुन त्याची हत्या करुन फरार झालेल्या पप्पु कुंजी शेख उर्फ साकेत उर्फ रमजान (३०) या आरोपीला वाशी रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी पप्पु कुंजी याने वाशी ते मानखुर्द रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकलमध्ये दिपकचा मोबाईल फोन लुटल्यानंतर मानखुर्द रेल्वे स्थानकात उतरुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दिपकने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, झालेल्या झटापटीत आरोपी पप्पु कुंजी याने दिपकवर चाकु हल्ला करुन त्याची हत्या केल्याचे तपासात उघडकिस आले आहे. या घटनेतील मृत दिपक हिरे हा खारघर येथे रहाण्यास होता. तसेच तो कपड्याचा व्यवसाय करत होता. शनिवारी पहाटे दिपक सुरत येथे कपडे आणण्यासाठी जात होता. त्यासाठी तो पहाटेच्या सुमारास लोकलच्या लगेज डब्यातून मुंबईच्या दिशेने जात होता. सदर लोकल सानपाडा रेल्वे स्थानकात आल्यानंतर आरोपी पप्पू कुंजी उर्फ साकेत उर्फ रमजान हा दिपक असलेल्या लगेज डब्यात चढला. त्यानंतर सदर लोकल वाशी रेल्वे स्थानकातून सुटून मानखुर्द रेल्वे स्थानकाजवळ आल्यानंतर आरोपी पप्पु कुंजी याने दिपक जवळ असलेला मोबाईल फोन जबरदस्तीने लुटला. त्यानंतर तो मानखुर्द रेल्वे स्थानकात उतरुन पळुन जात असताना, दिपकने देखील खाली उतरून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. वाचाः यावेळी दोघांमध्ये झटापट झाल्यानंतर आरोपी पप्पू कुंजी याने दिपकच्या पोटामध्ये चाकुने भोसकुन त्याठिकाणावरुन पळ काढला. या हल्ल्यात दिपक गंभीर जखमी झाल्याने रेल्वे पोलिसांनी त्याला राजावाडी हॉस्पीटलमध्ये दाखल केले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर वाशी रेल्वे पोलिसांनी अज्ञात हल्लेखोराविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन सीसीटीव्ही फुटेजवरुन आरोपीचा शोध घेतला असता, आरोपी पप्पु कुंजी हा खारघर येथील कोपरा गावात रहात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार रेल्वे पोलिसांनी त्याला कोपरा गावातून अटक केली. न्यायालयाने या आरोपीची २५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. वाचाः या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी पप्पु कुंजी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात मानखुर्द पोलीस ठाण्यात व आरसीएफ पोलीस ठाण्यात लुटमारी, जबरी चोरी, चोरी या सारख्या ५ गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु केसरकर यांनी दिली.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DFCyQl

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.