Type Here to Get Search Results !

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचे निधन

: ज्येष्ठ अभिनेत्री यांचे रविवारी करोना संसर्गामुळे निधन झाले. त्या ५८ वर्षांच्या होत्या. मुंबईतील सेव्हन हिल रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. माधवी यांच्या पश्चात पती आणि विवाहित मुलगी आहे. माधवी गोगटे यांनी मराठीसोबत हिंदी मनोरंजनक्षेत्रातही अभिनयाचा ठसा उमटवला होता. 'मिसेस तेंडुलकर', 'कोई अपना सा', 'ऐसा कभी सोचा न था', 'एक सफर', 'बसेरा', 'बाबा ऐसो वर ढुंडो', 'ढूंढ लेंगी मंझिल हमें', 'कहीं तो होगा' या हिंदी मालिकांतील त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. 'भ्रमाचा भोपळा', 'गेला माधव कुणीकडे' ही त्यांची नाटके कमालीची गाजली. 'घनचक्कर' या मराठी चित्रपटातील त्यांची भूमिकाही विशेष गाजली.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kTaO3e

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.