Type Here to Get Search Results !

मुंबईत महिला एसटी कर्मचाऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न; मंत्रालयासमोरची घटना

मुंबईः एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा आजचा आठवा दिवस आहे. अद्यापही एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघालेली नाहीये. एकीकडे सरकार एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन करत आहे. तर, कर्मचारी संपावर ठाम आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा संप अधिक तीव्र होत असल्याचं दिसत आहे. मुंबईत ३-४ संपकरी महिलांनी मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उगारले आहे. आज एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आठवा दिवस आहे. गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचार्यांनी आत्महत्येसारखं टोकाचे पाऊल उचलल्याने हा संप अधित तीव्र झाला आहे. आजही आंदोलनकर्त्या महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी या महिलांना वेळीच रोखल्याने पुढील अनर्थ टळला आहे. मंत्रालयासमोर ही घटना घडली. वाचाः दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून संपकरी मुंबईतील आझाद मैदानात ठाण मांडून बसले आहेत. कर्मचाऱ्यांच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही, अशी ठाम भूमिका या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. कर्मचारी संघटना आणि सरकारच्या शिष्टमंडळाच्या परिवहन मंत्र्यांसोबत चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. मात्र, अद्याप संपावर तोडगा निघालेला नाही. वाचाः आगार बंदच एसटी महामंडळातील कर्मचारी कामावर आल्याचा दावा महामंडळाने केला असला तरी २५०पैकी एकाही आगारातील गाड्यांच्या फेऱ्या पूर्ववत झालेल्या नाहीत. यामुळे कर्मचारी आले तर ते गेले कुठे , कर्मचारी येऊनही आगारातील साध्या फेऱ्या बंद का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qBmuLJ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.