Type Here to Get Search Results !

महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचा भगवा; भाजपनं शुभेच्छा देत लगावला टोला

मुंबईः दादरा-नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीच्या ()निकालात शिवसेनेच्या कलाबेन डेलकर () यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव करीत दणदणीत विजय मिळवला आहे. शिवसेनेने भाजपच्या विरोधात महाराष्ट्राबाहेर एक खासदार निवडून आणतानाच महाराष्ट्राबाहेर पहिल्यांदाच सीमोल्लंघनही केले आहे. शिवसेनेच्या या विजयावर भाजपचे नेते () यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खासदार मोहन डेलकर यांच्या निधनानंतर दादरा नगर हवेलीची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली होती. मतमोजणीच्या २४व्या फेरीअखेरपर्यंत शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांना एक लाख १७ हजार ५९० मते मिळाली. तर, प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार महेश गावित यांना ६६ हजार ६१० मते मिळाली. कलाबेन डेलकर यांनी भाजपचे उमेदवार महेश गावित यांचा ५१ हजारांच्या मताधिक्क्याने पराभव केला आहे. पहिल्यांदाच महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचा खासदार निवडून आल्यामुळं शिवसेनेच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. शिवसेनेच्या या विजयावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कामगिरीसाठी आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. आम्हाला दुःख वाटण्याचं कापण नाही, आम्हाला आनंदच आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना शिवसेनेने मराठी अस्मिता, हिंदुत्व हे सगळं गुंडाळून ठेवलं. ज्यांनी आयुष्यभर हिंदुत्वाला विरोध केला, मराठी अस्मितेला विरोध केला. स्वाभिमानाला विरोध केला त्यांच्याशीच सेनेने हातमिळवणी केली. दादरा नगर हवेलीची जागा जिंकल्याने सेना जर राष्ट्रीय राजकारणात जाणार असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा, असं खोचक ट्वीट प्रवीण दरेकर यांनी केलं आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3mM8NaF

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.