Type Here to Get Search Results !

मी लस घेतली नाही, घेणारही नाही; इंदुरीकर महाराजांनी सांगितलं करोनावरील औषध

नाशिकः प्रसिद्ध किर्तनकार (Indurikar Maharaj) यांनी करोना लसीबाबत केलेल्या विधानाची सध्या राज्यभरात चर्चा आहे. मी करोनाची लस घेतली नाही आणि घेणारही नाही, असं वक्तव्य इंदुरीकर महाराज यांनी केलं आहे. () नाशिक जिल्ह्यातील घोटी येथे कृपी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी मेळावा आणि इंदुरीकर महाराजांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ५०० हून अधिक जणांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात बोलताना इंदुरीकर महाराज यांनी करोना परिस्थिती व लसीबाबत खळबळ उडवून देणारे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळं ते पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. ज्याची त्याची प्रतिकार शक्ती वेगळी आहे हे कळायला नको का. प्रत्येकाच्या मेंदूची क्षमता देखील वेगळी आहे. मी सगळीकडे फिरतो. मी तर लस घेतली नाही आणि घेणारही नाही. काही होतंच नाही तर घेऊन करायचे काय? करोनाला एकच औषध आहे मन खंबीर ठेवा. १४ वर्ष राम वनवासात गेले होते तर सीतेला सोबत घेऊन गेले होते. इथे राम १४ दिवस क्वारंटाईन झाला तर सीतेने डोकावून पाहिला नाही, अस वक्तव्य इंदुरीकर महाराज यांनी केलं आहे. वाचाः यापूर्वीही इंदुरीकर महाराज किर्तनातून केलेल्या एका वक्तव्यामुळं वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला होता. इंदुरीकर महराज यांनी महिलाबाबत अक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला होता. सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असं वादग्रस्त वक्तव्य किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केलं होतं. त्यामुळं त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3pXQKA9

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.