Type Here to Get Search Results !

शिवसेनेला धक्का देण्याची तयारी करणाऱ्या भाजपलाच कल्याण-डोंबिवलीत खिंडार

डोंबिवली: आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून डोंबिवलीतील भाजपचा प्रभाव कमी करण्यासाठी शिवसेनेनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेच्या या प्रयत्नांना यश आलं असून तीन माजी नगरसेवकांसह भाजपचे काही मोठे पदाधिकारी शिवसेनेच्या गळाला लागले आहेत. ( in ) ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हे पदाधिकारी शिवसेनेत दाखल होणार असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. माजी नगरसेवक महेश पाटील, माजी नगरसेविका सुनीता पाटील आणि सायली विचारे यांचा यात समावेश असल्याचं समजतं. त्याचबरोबर परिवहन समिती सदस्य संजय राणे, खोणी ग्रामपंचायत सदस्य हनुमान ठोंबरे हे पदाधिकारीही त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत येत आहेत. डोंबिवली हा भाजपचा गड मानला जातो. मात्र, महापालिकेत शिवसेनेची ताकद मोठी आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे ५२ तर भाजपचे ४३ नगरसेवक निवडून आले होते. काँग्रेसला चार, राष्ट्रवादीला दोन, मनसेला ९, एमआयएमला एक जागा मिळाली होती. दहा जागांवर अपक्षांना यश मिळालं होतं. महापालिकेची मुदत संपल्यानं सध्या महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे. वाचा: करोनाची साथ ओसरल्यानंतर आता राज्यातील अन्य महापालिका निवडणुकांबरोबरच कल्याण-डोंबिवलीतही निवडणूक होणार आहे. त्या अनुषंगानं मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. युती तुटल्यानंतर व राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर भाजपनं राज्यातील शिवसेनेच्या शक्तीस्थानं ताब्यात घेण्याची व्यूहरचना आखली आहे. भाजपच्या व्यूहनीतीला शिवसेनेनं कल्याण-डोंबिवलीत जोरदार दणका दिला आहे. भाजपचे काही विद्यमान नगरसेवकही शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं समजतं.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nEutWz

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.