Type Here to Get Search Results !

विश्वासघाताने गेलेले सरकार पुन्हा मेहनतीने आणला येईल; चंद्रकांत पाटलांचे सूचक वक्तव्य

कोल्हापूरः राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजपनं पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातील विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरु झालीय. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष ()यांनी एक सूचक विधान केलं आहे. चंद्रकांत पाटील आज कोल्हापुरात आहेत. विधान परिषद निवडणुकीसाठी कोल्हापुरातून आज अमल महाडिक उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी अमल महाडिक यांच्या विजयाचा दावा केला आहे. तसंच, महाविकास आघाडीवरदेखील जोरदार निशाणा साधला आहे. 'देशात आगामी काळातही मोदींचीच सत्ता असणार आहे. ज्या राज्यकर्त्याला भविष्य कळतं त्या व्यक्तीला हे कळेलं. विश्वासघाताने गेलेलं सरकार पुन्हा एकदा मेहनतीने आणता येईल. नवीन वर्षात ते सरकार येईल. या पुढच्या राजकारणाला अधिक वेग येईल,' असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. वाचाः 'सहा वर्षांपू्र्वीची आणि आताची परिस्थिती यात फरक आहे. आवडे आणि कोरे मागच्यावेळी आमच्यासोबत नव्हते. आता ते आमच्यासोबत आहेत. या निवडणुकीतच नाही तर जिल्हा परिषद निवडणुकीपासून ते आमच्यासोबत आहेत. नवीन तयार झालेल्या नगरपालिकांमध्ये भाजपचं प्राबल्य आहे. १०५ भाजप तर कोरे आणि आवडे यांचे मिळून १६५ सदस्य होतात. बाकीची जुळवाजुळव सोपी आहे. कमी पडणारी ४३ मतं यायला काही अडचण येणार नाही,' असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. वाचाः भाजपची माघार काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांची विधान परिषदेत बिनविरोध निवड होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. काँग्रेसच्या विनंतीनंतर भाजपचे उमेदवार संजय केनेकर आपला उमेदवारी अर्ज माघारी घेणार आहेत. चंद्रकांत पाटील यांनी आज ही घोषणा केली आहे. सातव यांच्या घरात उमेदवारी गेली त्यामुळं आम्ही आमचा अर्ज आज मागे घेत आहोत. प्रज्ञा सातव यांना राज्यसभेची उमेदवारी मिळावी असा आमचा आग्रह होता. सातव यांच्या पत्नीला उमेदवारी मिळायला हवी ती किमान आता विधान परिषदेला मिळाली आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच, प्रज्ञा सातव यांच्या बिनविरोध निवडीसाठी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात व नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xaUFv0

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.