Type Here to Get Search Results !

अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचे कटकारस्थान सुरू; नवाब मलिकांचा धक्कादायक आरोप

मुंबईः 'अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधात खोटी तक्रार करुन कारवाई सुरू झाली. तसंच, माझ्याविरोधात काही केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी षडयंत्र रचत आहेत. माझ्या विरोधात स्वतः काही अधिकारी लोकांना व्हॉटस्अॅपद्वारे मसुदा तयार करुन पाठवतात आणि त्यांच्या ई- मेलच्या माध्यमातून माझ्या विरोधात खोटी तक्रार करायला भाग पाडतात. राज्यातील एका मंत्र्याविरोधात खोटी तक्रार करायला भाग पाडतात याचे माझ्याकडे पुरावे आहेत. खोटी तक्रार करुन मला अडकवण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणा कामाला लागली आहे,' असा धक्कादायक आरोप (Nawab Malik) यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी शुक्रवारी एक ट्विट करत काही लोकं माझ्या घरावर व शाळेवर पाळत ठेवत असल्याचा आरोप केला होता. तसंच, काही फोटोही ट्वीट केले आहेत. यापार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत या प्रकरणी मुंबई पोलिसांत तक्रार करणार असल्याचं म्हटलं आहे. तसंच, 'माझ्याविरोधात खोट्या तक्रारी करुन मला अडकवण्याचे प्रयत्न सुरु असून केंद्रीय तपास यंत्रणाच्या मदतीने हे सर्व सुरू आहे', असा धक्कदायक आरोप त्यांनी केला आहे. याबाबतीह मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. वाचाः 'एक अनिल देशमुख झाले तसे अनेक अनिल देशमुख होतील हा त्यांचा गैरसमज आहे. पण आम्ही हा डाव यशस्वी होऊ देणार नाही. आम्ही योग्य ती कारवाई करु,' असा इशारा नवाब मलिक यांनी केला आहे. 'जे माझ्याविरोधात षडयंत्र रचत आहे. त्यांचे पुरावे माझ्याकडे आले आहेत. खोटी तक्रार माझ्याविरोधात केली आहे. त्याचेही पुरावे माझ्याकडे आहेत. याबाबत मी पोलिसांकडे तक्रार करणार आहे,' असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. 'आर्यन खानचं प्रकरण जेव्हापासून सुरू झालंय आणि आम्ही काही चुकीच्या गोष्टी उजेडात आणल्या. गेल्या दोन महिन्यांपासून काही लोकं माझ्यावर घरावर पाळत ठेवत आहे. काही पक्षाचे कार्यकर्ते माझ्या घराची, कार्यालयाची आणि माझे लहान नातू कोणत्या शाळेत जातात याची माहिती काढत असल्याचं मला कळालं. मागच्या आठवड्यात मी दुबईत असताना दोन जण कॅमेरा घेऊन माझ्या घराचे फोटो काढत होते. तेव्हा घराच्या परिसरातील लोकांनीच त्यांना अडवलं. त्यानंतर ते पळू लागले. त्यांना टिळक टर्मिनस येथे पकडण्यात आलं, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. 'मी ट्विटरवर या लोकांचे फोटो टाकले त्यानंतर या २ पैकी एकाची माहिती समोर आली आहे. ही एक व्यक्ती मागील २ महिन्यापासून राज्यात जे सुरू होतं त्यावरून माझ्या विरोधात ट्वीट करत होता. त्याचं नावही समोर आलंय. या प्रकरणी मी पोलिसांकडे तक्रार देणार आहे. मी जेव्हा कुठं कागदपत्रे काढायला जातो किंवा कोणत्याही विभागात तक्रार करायला जातो तेथे ठिकठिकाणी यातील एक व्यक्ती दिसून आला आहे. त्यांना नेमकं काय करायचं आहे?, असा सवालही त्यांनी केला आहे. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nTS05V

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.