Type Here to Get Search Results !

आष्टा येथे शाळेची व्हॅन कॅनॉलमध्ये कोसळली; अकरा विद्यार्थी जखमी

म. टा. प्रतिनिधी, सांगली येथे क्लेरमोंट शाळेची व्हॅन (एम. एच. १० ए.डब्लू. ५०९४)) कॅनॉलमध्ये कोसळल्याने अकरा विद्यार्थी जखमी झाले आहेत. या अपघातात व्हॅनचा चालक व सहाय्यक महिलाही जखमी झाली. सोमवारी सकाळी साडे आठच्या सुमारास आष्टा-मर्दवाडी रोडवर हा अपघात झाला. मिरजवेसकडून एक पिवळ्या रंगाची टाटा मॅजिक कंपनीची स्कुल व्हॅन भरधाव वेगाने पुलाच्या संरक्षक दगडाला थटून कॅनॉलमध्ये कोसळली. यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी जखमी विद्यार्थ्यांना कॅनॉलमधून बाहेर काढले. अकरा विद्यार्थी, ड्रायव्हर व सहाय्यक महिलेस बाहेर काढून उपचारासाठी पाठवले. यामध्ये प्रियांशी संदीप फडतरे (वय ११, रा. तुंग इयत्ता पाचवी) हिच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली आहे. शरण्या प्रफुल्लकुमार खोत (वय ५, सिनियर के.जी.) हिला डाव्या हाताच्या मनगटास मार लागला. नंदिनी प्रवीणकुमार गायकवाड (वय ५, इयत्ता पहिली रा. आष्टा) हिच्या डोक्यास मार लागला. मनस्वी रवींद्र नलवडे (वय ७, सिनियर केजी) हिच्या डाव्या हाताचे मनगट व कमरेला मार लागला. तसेच इतर ७ विध्यार्थ्यांना हात, पायास व डोक्यास दुखापत झाली आहे. व्हॅनमधील मावशी वैशाली राजेंद्र झिनगे यांना हात, पायास खरचटून मुका मार लागला. चालक ओंकार जयवंत घेवदे (रा. अंकलखोप, तालुका- पलूस) यास हातापायास मुका मार लागून तो जखमी झाला. सदर व्हॅन सचिन मिलिंद लांडगे (रा. अंकलखोप) यांची आहे. दरम्यान, चालक ओंकार जयवंत घेवदे (रा. अंकलखोप) याच्याविरुद्ध रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने व्हॅन चालवून विध्यार्थ्यांना जखमी होण्यास कारणीभूत धरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभय राजकुमार चौगुले यांनी आष्टा पोलीस ठाण्यात ही फिर्याद दिली आहे. आष्टा पोलिस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3HrrqsE

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.