मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांनी आज अखेर समोर येत आपली बाजू नव्याने मांडली आहे. देशमुख यांनी एक व्हिडिओ जारी केला असून त्यासोबतच एक खुलं पत्रही ट्वीटरवर पोस्ट केलं आहे. 'सत्यमेव जयते' म्हणत यात देशमुख यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. त्याचवेळी तपास यंत्रणेकडून संपूर्ण प्रकरणात निष्पक्ष चौकशीची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. ( ) वाचा: अनिल देशमुख यांनी मंत्रिपदाचा गैरवापर केला. त्यांनी याला दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते, असा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी यांनी केला होता. या आरोपाची हायकोर्टाच्या निर्देशावरून व मार्फत चौकशी सुरू आहे. याप्रकरणात चौकशीसाठी ईडीने वारंवार समन्स बजावूनही देशमुख चौकशीसाठी हजर राहत नसल्याने व ते नॉट रीचेबल असल्याने अनेक तर्क लावले जात होते. असे असतानाच आज अचानक देशमुख समोर आले. ट्वीटरच्या माध्यमातून आपले निवेदन जारी करताना देशमुख तडक ईडी कार्यालयात हजर झाले. वाचा: देशमुख यांनी आज जे खुलं पत्र लिहिलं आहे त्यात आपली बाजू मांडताना तक्रारदार परमबीर सिंग यांच्याबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. 'मी एका समर्पित भावनेने आणि कायद्याच्या चौकटीत राहून आयुष्य जगलो आहे. सार्वजनिक जीवनात वावरत असताना आजतगायत माझ्यावर कोणतेही आरोप झाले नाहीत. माझे आयुष्य म्हणजे एक खुली किताब आहे. माझ्याकडे लपवून ठेवण्यासारखे काहीही नाही', असे नमूद करताना देशमुख यांनी परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांच्याकडे बोट दाखवले. वाचा: माझ्यावर जे आरोप करण्यात आले आहेत ते धादांत खोटे आहेत. हे जाणीवपूर्वक करण्यात येत आहे. यात कुणाचे तरी वेस्टेड इंटरेस्ट आहेत. मुख्य म्हणजे जे तक्रार करणारे आहेत त्यांची नैतिकता आणि विश्वासार्हता तपासण्याची गरज आहे. खंडणीची वेगवेगळी रॅकेट, फ्रॉड केसेस, इतकंच काय खून प्रकरणात ही व्यक्ती सामील आहे. यातली जी मुख्य व्यक्ती आहे ती तर पोलीस आयुक्त राहिली आहे आणि सध्या वॉन्टेड आरोपी आहे, याकडे लक्ष वेधत निष्पक्ष चौकशीची अपेक्षा देशमुख यांनी व्यक्त केली. मी संविधान मानणारा भारताचा नागरिक असून ईडी करत असलेल्या चौकशीला सामोरा जात आहे. ईडीच्या तपासाला मी संपूर्ण सहकार्य करणार आहे. केवळ चौकशी निष्पक्षपातीपणे व्हावी इतकीच अपेक्षा आहे, असे देशमुख यांनी नमूद केले. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Ya4e0g