नागपूर: राज्यातील अनेक भागांत हवामानात गारठा जाणवू लागला आहे. शहर आणि विदर्भात आता हळूहळू आल्हाददायक थंडीला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहरातील तापमानात घसरण होते आहे. सोमवारी शहरात १३.४ अंश इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. राज्यातील येथे सर्वात कमी १२.२ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. त्याखालोखाल नागपूर हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड शहर ठरले. ( ) वाचा: नागपूरखालोखाल विदर्भात यवतमाळात १४, येथे १४.१ अंश किमान तापमानाची नोंद करण्यात आली. वाशीम येथे १९ अंश इतक्या सर्वाधिक किमान तापमानाची नोंद करण्यात आली. शहरातील वातावरण आता पूर्णपणे बदलले असून पाऱ्यात घसरण होऊ लागली आहे. रविवारच्या तुलनेत शहरातील तापमानात १.३ अंशांची घसरण झाली. शहरातील तापमान हे सरासरी किमान तापमानापेक्षा ४.२ अंशांनी कमी होते. पुढील दोन दिवस शहरात आल्हाददायक थंडी असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मात्र, थोडेफार ढगाळ वातावरण असल्याने तापमानात एक-दोन अंशांनी वाढसुद्धा होऊ शकते. वाचा: विदर्भात ३ व ४ नोव्हेंबर रोजी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. चंद्रपूर, व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या फुलक्या सरींची शक्यता आहे. इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता नसली तरीसुद्धा थोडेफार ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तरीही दिवाळीनंतर विदर्भातील वातावरण परत एकदा पूर्णपणे कोरडे होईल व तापमानात हळूहळू घसरण होणार असून खऱ्या अर्थाने थंडी सुरू होणार असल्याचाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nJNl5j