Type Here to Get Search Results !

शक्ती मिल सामुहिक बलात्कार प्रकरण: आरोपींची फाशीची शिक्षा रद्द; कोर्टाचा मोठा निर्णय

मुंबईः संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी () आज मुंबई हायकोर्टाने मोठा निकाल दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने तीन आरोपींची फाशीची शिक्षा रद्द केली असून तिघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. २०१३मधील या प्रकरणातील फाशीच्या शिक्षेला आव्हान दिलं होतं. शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने विजय जाधव, कासीम बंगाली, सलिम अंसारी यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. या तिघांनी मुंबई हायकोर्टात याचिका केली होती. त्यानुसार आज या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. आज निर्णय देताना कोर्टाने तिघा आरोपींची फाशीची शिक्षा रद्द केली असून शिक्षेचे जन्मठेपेत रुपांतर करण्याचा निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती साधना जाधव व न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. वाचाः फाशीच्या शिक्षेने पश्चात्तापाची संकल्पना संपुष्टात येते. या प्रकरणात दोषी हे फाशीच्याच शिक्षेसाठी पात्र आहेत, असे म्हणता येणार नाही. केलेल्या गुन्ह्याबद्दल आयुष्यभर पश्चात्ताप करण्यासाठी ते पात्र आहेत. त्यांच्या बाबतीत सुधारणेविषयी कोणताही वाव नाही आणि समाजात पुन्हा मिसळण्यासाठीही ते पात्र नाहीत. भारतीय दंड संहितेतील ३७६-ई या कलमान्वये बलात्काराच्या गुन्ह्याच्या प्रकरणात आधी दोषी ठरलेल्याने पुन्हा बलात्काराचा गुन्हा केल्यास त्याला फाशीची किंवा मरेपर्यंत जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे. त्याअनुषंगाने दोषींना नैसर्गिकपणे मरण येईपर्यंत जन्मठेप सुनावण्यात येत आहे, असे न्यायमूर्ती साधना जाधव व न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने निर्णयात स्पष्ट केले आहे. वाचाः काय आहे प्रकरण? मुंबईतील महालक्ष्मी येथील शक्ती मिल कंपाऊंडमध्ये २२ ऑगस्ट २०१३ ला एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. छायाचित्रकार असणारी महिला आपल्या सहकाऱ्यासोबत फोटाग्राफी करण्यासाठी गेली होती. यावेळी पाच जणांनी तिच्यावर बलात्कार केला होता. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3FMOqkg

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.