Type Here to Get Search Results !

नव्या स्ट्रेनचा धोका: महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध; जारी केल्या कठोर गाइडलाइन्स

मुंबई: करोनाचा नवा आढळल्यानंतर दक्षिण आफ्रिका, बोत्स्वाना आणि हाँगकाँग येथून येणाऱ्या प्रवाशांच्या काटेकोर तपासणीचे निर्देश केंद्र सरकारने दिले असतानाच सरकारनेही आज मोठे पाऊल उचलत अधिक कडक केले आहेत. राज्य सरकारने आज प्रवास व अन्य बाबींसाठी नवी नियमावली जारी केली आहे. ( ) वाचा: कोविडच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात रुग्णसंख्येचा मोठा उद्रेक पाहायला मिळाला होता. राज्य दुसऱ्या लाटेतून सावरत असतानाच कोविडच्या नव्या स्ट्रेनचा धोका निर्माण झाला असून ही बाब लक्षात घेत राज्य सरकार सतर्क झालं आहे. त्यानुसार काही महत्त्वाचे निर्णय घेत नियमावली निश्चित करण्यात आली आहे. विदेशातून राज्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांना आता केंद्र सरकारचे निर्देश लागू राहणार आहेत. तर राज्यांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोविडवरील लसचे दोन्ही डोस म्हणजेच संपूर्ण लसीकरण आवश्यक असेल. तसे नसल्यास संबधित प्रवाशाला ७२ तासांपूर्वी केलेल्या चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत ठेवावा लागणार आहे. वाचा: संपूर्ण लसीकरण झाले असेल तरच... संपूर्ण लसीकरण झाले असलेल्या नागरिकांनाच सवलती देण्याचे धोरण पुन्हा एकदा राज्य सरकारने अवलंबले आहे. त्यानुसार आता कार्यालये, दुकाने, मॉल तसेच कोणत्याही समारंभात सहभागी व्हायचे असल्यास संपूर्ण लसीकरणाची अट घालण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे सर्व प्रकारच्या सार्वजनिक वाहतूक सेवांमध्येही आता संपूर्ण लसीकरण झाले असेल तरच प्रवेश हे सूत्र ठरवण्यात आले आहे. राज्य सरकारने दिलेला किंवा कोविन प्रमाणपत्र (वैध ओळखपत्रासह) पुरावा म्हणून दाखवावा लागेल. १८ वर्षांखालील मुलांना शाळेचं ओळखपत्र दाखवून प्रवेश दिला जाईल. जी व्यक्ती वैद्यकीय कारणास्तव लस घेऊ शकली नाही त्याला त्याबाबतची अधिकृत कागदपत्रे दाखवल्यावर प्रवेश मिळू शकेल. असे आहेत नवे नियम... - चित्रपटगृह, सभागृह, थीएटर, लग्नाचा हॉल अशा ठिकाणी एकूण क्षमतेच्या ५० टक्के लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी असेल तर लॉन्स, मैदाने अशा ठिकाणी लग्न वा इतर समारंभ करायचा असल्यास एकूण क्षमतेच्या २५ टक्के उपस्थितीचे बंधन असणार आहे. - टॅक्सी, खासगी कार यांमध्ये प्रवास करतानाही कोविड नियमांचे पालन बंधनकारक असेल. - कोविड नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधितावर ५०० रुपये दंड आकारण्यात येईल. सार्वजनिक सेवेतील बसचा चालक अथवा वाहक नियम मोडत असेल तर त्यालाही हा दंड लागू असेल. - एखाद्या बसमधून प्रवास करणारा प्रवासी नियम पाळत नसेल तर संबंधित वाहनाच्या मालकावर १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xuZMX5

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.