Type Here to Get Search Results !

नव्या स्ट्रेनचा मुंबईला किती धोका?; चहल यांनी दिली 'ही' महत्त्वाची माहिती

मुंबई: 'आफ्रिकन देशांमध्ये विषाणूचा नवीन प्रकार आढळल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा लक्षात घेता अनेक देशांनी व विमान कंपन्यांनी सावध पावले टाकली आहेत. त्याच धर्तीवर मुंबईत येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची मागील पंधरा दिवसांच्या प्रवासाची आवश्यक माहिती संकलित करावी. नवीन विषाणू प्रकाराने बाधित असलेल्या आफ्रिकन देशांमधून थेट मुंबईत येणारी विमाने नाहीत, ही तूर्तास दिलासादायक बाब असली तरी गाफील राहून मुळीच चालणार नाही', अशी महत्त्वाची सूचना आयुक्त डॉ. यांनी शनिवारी दिली. ( ) वाचा: आफ्रिकन देशांमध्ये आढळलेला कोविड विषाणूचा नवीन प्रकार अधिक संसर्गजन्य आहे, असे वैद्यकीय तज्ञांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यांनी शनिवारी इक्बालसिंह चहल यांच्याशी चर्चा केली व काही निर्देश दिले. याच अनुषंगाने महानगरपालिकेचे प्रमुख वरिष्ठ अधिकारी, मुंबईचे सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे अधिकारी, महानगरपालिकेच्या सर्व प्रमुख रुग्णालयांचे अधिष्ठाता, टास्क फोर्सचे सदस्य या सर्वांसोबत संयुक्त बैठक चहल यांनी घेतली. या बैठकीत कोविड विषाणूचा प्रकार आणि त्या पार्श्वभूमीवर घ्यावी लागणारी खबरदारी या दिशेने सविस्तर चर्चा करण्यात आली. 'येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी स्वयंघोषणा पत्र देऊन मागील पंधरा दिवसातील आपल्या प्रवासाची माहिती देणे गरजेचे आहे. त्यांचे पारपत्र (पासपोर्ट) विमानतळ अधिकाऱ्यांनी बारकाईने तपासावेत. प्रचलित पद्धतीनुसार या सर्व प्रवाशांची वैद्यकीय तपासणी आणि चाचणी तसेच अलगीकरण अत्यंत काटेकोरपणे करावे. केंद्र आणि राज्य सरकारच्या सूचना लवकरच प्राप्त होणे अपेक्षित असून त्यानुसार विमानतळावर येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या चाचणी, अलगीकरण इत्यादींबाबत सविस्तर सूचना महानगरपालिकेच्या वतीने निर्गमित करण्यात येतील, विमानतळावर व्यवस्था वाढवताना कोणतीही कमतरता राहणार नाही, या दृष्टीने सुसज्ज राहावे', असे यावेळी चहल यांनी सांगितले. वाचा: मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेली सर्व जम्बो कोविड सेंटर योग्य क्षमतेने कार्यान्वित राहतील, यादृष्टीने त्यांची पुन्हा फेरपाहणी करावी. त्यामध्ये वैद्यकीय आणि इतर आवश्यक मनुष्यबळ, औषधसाठा, वैद्यकीय प्राणवायू निर्मिती व साठा, विद्युत व्यवस्था, अग्निशमन व्यवस्था या सर्व बाबींचा आढावा घ्यावा, अशा महत्त्वाच्या सूचना चहल यांनी केल्या. कोविड विषाणू संसर्ग पूर्णपणे संपलेला नाही, असे वारंवार बजावूनही बरेचसे नागरिक बेफिकीरपणे वावरत असल्याचे निदर्शनास येत आहे, ही चिंतेची बाब आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले की, योग्य प्रकारे मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने देखील पुन्हा कडक कारवाई सुरू करावी. लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांनाच सार्वजनिक ठिकाणी प्रवेश देण्याबाबत भर दिला पाहिजे. विविध आस्थापना, दुकाने, मॉल, चित्रपटगृह अशा सार्वजनिक ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले नसल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असेही आयुक्तांनी स्पष्टपणे सांगितले. मुंबईमध्ये कोविड लसीची पहिली मात्रा देण्याचे लक्षांक पूर्ण केले तसे आता दुसरी मात्रा देण्याचे लक्षांक देखील तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे, या मुद्द्यावरही डॉ. चहल ह्यांनी भर दिला. वाचा: कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या दिशेने सर्व विभागीय कार्यालयांनी वॉर्ड वॉर रूम पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी कोणत्या उपाययोजना नव्याने कराव्या लागतील, त्याचा आढावा घ्यावा. झोपडपट्टी व तत्सम भागांमध्ये सार्वजनिक प्रसाधनगृहांमध्ये दिवसातून किमान पाच वेळा पूर्ण निर्जंतुकीकरण करावे. सर्व खासगी रुग्णालयांनी देखील कोविड उपायोजना करण्याच्या दृष्टीने पुन्हा तयारीला लागावे. रुग्णवाहिका व इतर वाहने उपलब्ध होतील, यासाठी पूर्वतयारी सुरू करावी अशा विविध सूचना चहल यांनी या बैठकीत केल्या. टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी यांनीदेखील मार्गदर्शन केले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3cUSWAH

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.