Type Here to Get Search Results !

विधानपरिषद निवडणूक बिनविरोध?; चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

कोल्हापूर: नेत्यांच्या विनंतीला मान देत राज्यसभा व विधानपरिषदेची एक जागा आम्ही बिनविरोध केली. आता राज्यातील विधानपरिषदेच्या सहा जागांबाबत काँग्रेसने चांगला प्रस्ताव दिल्यास ही निवडणूक बिनविरोध करण्याची आमची तयारी आहे, असे सूतोवाच प्रदेशाध्यक्ष यांनी केले. दरम्यान, आतापर्यंत असा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचा खुलासाही त्यांनी केला. ( ) वाचा: विधानपरिषदेच्या सहा जागा बिनविरोध करण्याच्या हालचाली राज्यपातळीवर सुरू आहेत. याबाबत कोल्हापूर येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, 'मुंबईतील एक जागा वगळता आम्ही कोल्हापूर, नागपूर, अकोला, धुळे या सर्व ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत. नागपूर, धुळे आम्ही एकतर्फी जिंकणार आहोत. अकोला आणि कोल्हापुरात अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. मुंबईतील एक जागा शिवसेनेला तर दुसरी भाजपला मिळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सहा पैकी पाच जागा भाजप जिंकणार अशी स्थिती आहे. अशावेळी काँग्रेसकडून चांगला प्रस्ताव आल्यास निवडणूक बिनविरोध करण्याची आमची तयारी आहे.' वाचा: पाटील म्हणाले, 'या निवडणुकीत एका जागेवर लढत आहे. कुठेच लढणार नाही. त्यामुळे पाच जागांबाबत काँग्रेसने प्रस्ताव दिला तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. आतापर्यंत असा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. आला तर तो प्रदेशाध्यक्ष या नात्याने माझ्याकडेच येईल. पैसा, वेळ वाया घालवत न बसता ही निवडणूक बिनविरोध करण्याबाबत भाजपची भूमिका लवचिक असेल. मात्र, बिनविरोध बाबत आम्ही प्रस्ताव देणार नाही. त्यांचा आला तर स्वीकारू अन्यथा ही निवडणूक ताकदीने लढवू.' राज्यात भाजपचे सरकार येणार असे चंद्रकांत पाटील आतापर्यंत २८ वेळा म्हटल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे, याबाबत विचारले असता ते म्हणाले, 'एक दिवस लांडगा आला रे आला या कथेप्रमाणे राज्यात राजकीय घडामोडी होतील. तेव्हा त्यांना कळेल.' वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3HKdF8p

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.