Type Here to Get Search Results !

अमित शहा यांचा पुणे दौरा लांबणीवर? कारण काय?

म. टा. प्रतिनिधी, पुणेः केंद्रीय गृहमंत्री यांचा या महिनाअखेरीचा नियोजित दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. शहा पुढील महिन्यांत ११-१२ डिसेंबर रोजी पुण्यात येणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दिली. सध्या ठरलेल्या दौऱ्यानुसारच शहा यांचा सर्व कार्यक्रम होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शहा २६ नोव्हेंबर रोजी पुणे दौऱ्यावर येणार होते. त्यांच्या उपस्थितीत पुणे महापालिकेत दोन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिकेच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात येणार आहे. त्या स्मारकाचे भूमिपूजन; तसेच महापालिकेच्या नवीन इमारतीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण गृहमंत्री शहा यांच्या हस्ते करण्याची तयारी भाजपने केली होती. याशिवाय शहरात त्यांचे इतर कार्यक्रमही नियोजित होते. मात्र, त्यांचा दौरा रद्द झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. महापालिकेच्या निवडणुका फेब्रुवारी महिन्यात प्रस्तावित आहेत. या पार्श्वभूमीवर शहा यांचा पुण्यातील दौरा महत्त्वाचा मानला जात होता. भाजपला शहा यांच्या दौऱ्यात शक्तिप्रदर्शन करण्याची संधी मिळणार होती. या महिनाअखेरीस होणाऱ्या दौऱ्यासाठी तयारीही करण्यात आली होती. हा दौरा पुढे ढकलला गेल्याने कार्यक्रमांच्या तयारीसाठी अधिक वेळ मिळाला असल्याची प्रतिक्रिया भाजपमधील ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केली आहे. भाजपचे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यात भाजपच्या वतीने विविध विकासकामांचा आरंभ आणि महानगरपालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार असल्याचे समजते. खरे तर ही गलितगात्र झालेल्या भाजपची केविलवाणी धडपड आहे. भाजपच्या १०० नगरसेवकांनी सत्तेच्या काळात काय दिवे लावले आहेत, हे सर्वांनाच माहिती आहे. - प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे भूमिपूजन या कार्यक्रमासाठी अमित शहा येणार म्हणून भाजपच्या पायाखालची वाळू घसरण्याचा विचार करणाऱ्या प्रशांत जगताप यांची कीव येते. 'राष्ट्रवादी'त राहून जगताप यांची झेप फक्त सत्ता आणि निवडणूक यापुरतीच मर्यादित झाली आहे. - गणेश बीडकर, सभागृह नेते, महापालिका


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qS0WdV

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.