Type Here to Get Search Results !

मोदींच्या विरोधात विरोधी पक्षांकडं चेहराच नाही?; शरद पवार म्हणाले...

नाशिक: केंद्र सरकारी यंत्रणांकडून विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या सुरू असलेल्या चौकशा व धाडींच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष () यांनी आज देशाच्या राजकारणावर महत्त्वपूर्ण भाष्य केलं. पंतप्रधान यांच्या विरोधात विरोधकांकडं सक्षम चेहरा नाही या चर्चेलाही त्यांनी उत्तर दिलं. जिल्ह्यातील निफाडच्या दौऱ्यावर शरद पवार यांनी आज राज्य व केंद्रीय पातळीवरील सर्व राजकीय प्रश्नांना उत्तरं दिली. विरोधकांकडं चेहरा नसल्याची चर्चा त्यांनी आणीबाणीच्या काळातील दाखला देत फेटाळून लावली. 'इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली तेव्हा त्यांच्या विरोधातही नेतृत्व नव्हतं. मात्र, सगळ्या शक्ती मोरारजी देसाई यांच्या मागे उभ्या राहिल्या आणि नेतृत्व उभं राहिलं. त्यामुळं विरोधी पक्षाकडे चेहरा नाही असं म्हणता येणार नाही,' असं पवार म्हणाले. वाचा: ईडी, सीबीआय व आयकर विभागांच्या धाडी संदर्भातही त्यांनी प्रतिक्रिया दिली. 'काही ठराविक अधिकाऱ्यांच्या मार्फत ठराविक व्यक्ती किंवा विचारधारेंच्या लोकांना कसा त्रास देणं हा सध्याच्या राज्यकर्त्यांचा दृष्टिकोनच आहे. धाडी, चौकशा हा आता नित्याचा भाग झालाय. त्यासाठी अधिकाऱ्यांचा वापर केला जातोय. विशिष्ट अधिकाऱ्यांना विशिष्ट ठिकाणी नियुक्त केलं जातंय. मुदतवाढ दिली जातेय हे सगळं सुरू आहे. आमच्या बाबतीत म्हणाल तर आम्ही आता त्याची चिंता करत नाही. सुरुवातीला आम्ही अस्वस्थ व्हायचो. आता या सगळ्याला तोंड द्यायची मानसिकता तयार झालीय, असं ते म्हणाले. 'ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे, त्यांना लोकांच्या अपेक्षांची पूर्तता करता येत नाही. त्यामुळं लक्ष दुसरीकडं वळवण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळं यातना होतील, पण या सगळ्याला शेवटी सामान्य माणूस उत्तर देईल आणि लोकशाहीला हरताळ फासणाऱ्यांना बाजूला करतील,' असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला. 'त्यांना दिवस मोजत बसावं लागेल' महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याबाबतही शरद पवार यांनी मत मांडलं. 'एकमेकांशी जुळवून घ्यायचं हे आम्ही ठरवलं आहे. त्यामुळं हे सरकार सुरू आहे. आज सरकार जाईल, उद्या जाईल, असं दिवस मोजण्याचं काम विरोधकांना करावं लागणार आहे,' असं पवार म्हणाले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2YRxXLO

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.