Type Here to Get Search Results !

मोदी आणि भाजपला कसं रोखणार?; शरद पवारांनी सांगितला 'मेगा प्लान'

नागपूर: ' विरोधी आघाडीचं नेतृत्व कोण करणार हा प्रश्न गौण असून देशातील जनतेला पुढील लोकसभा निवडणुकीत राजकीय पर्याय देण्याची गरज आहे', असे अत्यंत महत्वाचे विधान करत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा यांनी देशात भाजप आणि पंतप्रधान यांच्याविरुद्ध भक्कम अशी आघाडी उभारली जाणार असल्याचे सूतोवाच केले आहेत. ( ) वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपसमोर आव्हान उभे करायचे असेल तर आतापासूनच विरोधी पक्षांची मोट बांधली गेली पाहिजे आणि त्याचे नेतृत्व शरद पवार यांच्यासारख्या तगड्या नेत्याने केले पाहिजे, असा एक सूर पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून देशात एक सक्षम राजकीय पर्याय उभा करण्याची गरज अधोरेखित केली आहे. लोकभावनेचा विचार करून भाजपसमोर राजकीय पर्याय उभा करण्याची आम्हा सर्वांची जबाबदारी असून हा पर्याय देत असताना नेतृत्व कोण करणार, हा मुद्दा आत्ता महत्त्वाचा नसल्याचे पवार म्हणाले. वाचा: पवार यांनी शेतकरी आंदोलनावर बोट ठेवत केंद्रावर तोफ डागली. 'उत्तर प्रदेश येथील लखीमपुर खीरी येथे तब्बल एक वर्ष होऊनही तिथला शेतकरी लढा देत आहे. मात्र जो देशाच्या भूकेचा प्रश्न सोडवतो त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी दिल्लीतील सरकारला वेळ नाही. तिथे ७०-८० वर्षांचा शेतकरी आंदोलनाला बसला आहे. आया-बहिणी तिथे सगळ्यांचे जेवण करतात. तीच गोष्ट हरयाणा, राजस्थान याठिकाणी आहे. शेतकरी, कामगार, सामान्य माणूस या सगळ्यांच्या यातना केंद्र सरकार वाढवत आहे. अशा लोकांना धडा शिकवण्याचे काम आता करायला हवे, असे आवाहन पवार यांनी केले. आज तेल, घासलेट, पेट्रोल, गॅसच्या किमती प्रचंड वाढल्यात. गरीब आणि सामान्य माणसाच्या हिताच्या गोष्टींचा आदर करण्याची भूमिका या केंद्र सरकारची नाही. त्यामुळेच लोकांना यातना कशा दिल्या जातील ही भूमिका ते घेत असतात, असा आरोपही पवार यांनी केला. राज्य सरकारमध्ये दोन्ही काँग्रेसचा महत्त्वाचा सहभाग 'तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नाने यांच्या नेतृत्वाखाली एक सरकार उभे करण्यात आपल्याला यश मिळाले. या सरकारमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचा महत्त्वाचा सहभाग आहे. राज्याला स्थिर कारभार देऊन राज्य प्रगतीच्या मार्गाकडे न्यायचा निर्णय आम्ही घेतला. पण काही लोकांना हे पटत नाही. काहींच्या हातून सत्ता गेल्याने त्यांच्यात एक अस्वस्थता निर्माण झाली. यातूनच दिल्लीच्या मदतीने इथलं राज्य कसं घालवता येईल यासाठी अखंड प्रयत्न सुरू केलेले दिसत आहेत. त्याची सुरुवात म्हणून सरकारमधील नेत्यांचा वेगवेगळ्या केंद्रीय संस्थांचा वापर करून एकप्रकारे छळवाद करण्याचे काम सुरू आहे', असा आरोप पवार यांनी केला. आताचे केंद्र सरकार हे एखाद्या राज्यात सत्ता मिळाली नाही तर सत्तेचा गैरवापर करून त्या राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असते, असेही पवार म्हणाले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3oFjj36

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.