Type Here to Get Search Results !

सामना जिंकून जल्लोष सुरू असताना मैदानावरच क्रिकेटपटूचा मृत्यू, काळजाचा ठोका चुकावणारी घटना

कोल्हापूर : करोनाच्या भीषण काळात जीवन-मृत्यूचा एक वेगळा चित्रपट सगळ्यांनी पाहिला. अनेक दिग्गजांच्या खळबळजनक मृत्यूनंतर आजही अनेकजण धक्क्यातून सावरले नाहीत. खरंतर, सध्या कसा-कुठे मृत्यू होईल याचा काही नेम नाही, असाच एक धक्कादायक प्रकार कोल्हापूरमध्ये समोर आला आहे. कोल्हापूरमध्ये क्रिकेटच्या मैदानातच अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या एका सामनावीराचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. किक्रेटच्या सामन्यात मैदानावर अष्टपैलू कामगिरी करत सामनावीरचा बहुमान पटकावला. बक्षिस वितरणानंतर संघातील खेळाडू जल्लोष करत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो जमिनीवर कोसळला आणि त्यातच त्याचा दुर्दवी मृत्यू झाला. हातकणंगले तालुक्यातील अंबप येथे अंबप स्पोर्टस आणि अशोकराव माने ग्रुपच्यावतीने अंबप प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. स्वामी विवेकानंद संस्थेच्या राजेंद्र हायस्कूलच्या मैदानावर अंतिम सामना झाला. या सामन्यात अमर साबळे (वय ३२, रा. अंबपवाडी) याने अष्टपैलू कामगिरी करत राजमंगल स्पोर्टस् ला विजय मिळवून दिला. त्याची सामनावीर म्हणून निवड झाली आणि मान्यवरांनी त्याला बक्षिस दिले. संघातील खेळाडू आणि समर्थक जल्लोष करत असताना अमरला हृदयविकाराचा तीव्र झटका आला तो जमिनीवर कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात उपचारास दाखल केले. पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. त्याचा चटका लावणारा मृत्यू परिसरातील क्रीडा प्रेमींना हूरहूर लावून गेला.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3c001j4

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.