Type Here to Get Search Results !

गुड गोइंग! नवाब मलिक यांच्या लढ्याचे मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई मुंबईतील क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीच्या चुकीच्या कारवायांवर बोट ठेवणारे अल्पसंख्याकमंत्री () यांनी पुढच्या टप्प्यात थेट राज्यातील भाजपच्याच बड्या नेत्यांविरोधात आरोपांचे बॉम्ब फोडण्यास सुरुवात केल्याने राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. विशेष म्हणजे बुधवारी याचे पडसाद मंत्रिमंडळ बैठकीतही उमटले. नवाब मलिक यांनी सुरू केलेल्या लढ्याचे मंत्रिमंडळात जोरदार कौतुक करताना मंत्रिमंडळाने त्यांना पाठिंबाही दर्शवल्याचे कळते. मुख्यमंत्री (Uddhav Thackeray) यांनीही मलिक यांच्या लढ्याचे कौतुक करताना 'गुड गोइंग' असे म्हणत अशीच लढाई पुढेही सुरू ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. मुंबईतील क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन याला अटक झाल्यानंतर खळबळ उडाली होती. अशावेळी अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीच्या कारवाईबाबत संशय व्यक्त करीत कथित पुरावे सादर केले. या कारवाईला राज्यातील भाजपचा कसा आशीर्वाद आहे, याची उदाहरणे देताना त्यांनी या प्रकरणाशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचाही संबंध जोडला. साहजिकच यामुळे राज्यातील भाजप खवळला असून, पक्षाच्या नेत्यांनी चारही बाजूंनी मलिक यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर बुधवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवाब मलिक यांचे सर्वच मंत्र्यांनी कौतुक केल्याचे समजते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत नवाब मलिक यांनी आत्तापर्यंत ज्या पद्धतीने एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना व्हिडीओ क्लिप, कागदपत्रे सादर केली, त्याचा उल्लेख करीत मलिक यांचे कौतुक केले. 'नवाब मलिक...गुड गोइंग' असे मुख्यमंत्र्यांनी म्हणताच उपस्थित सर्वच मंत्र्यांनी त्याला प्रतिसाद दिला. 'मलिक यांनी जी भूमिका घेतली आहे, ती अशीच पुढे सुरू ठेवावी', अशी अपेक्षा मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त करताच सर्व मंत्र्यांनी या लढ्याला पाठिंबा दर्शवला. 'भ्रम दूर होतोय....' सार्वजनिक बांधकाममंत्री यांनी मलिक यांचे मोजक्या शब्दांत मलिक यांचे कौतुकही केल्याचे कळते. 'तुमचे कौतुक कोणत्या शब्दांत करावे, हेच समजत नाही. तुम्ही सत्यासाठी तर लढतच आहात, पण आपण सर्वशक्तिमान आहोत, असा जो काही अनेकांचा असलेला भ्रमही तुमच्यामुळे दूर होत आहे, हे महत्त्वाचे आहे', असे चव्हाण यांनी म्हटल्याचे कळते.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3c76to9

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.