Type Here to Get Search Results !

खरं स्वातंत्र्य २०१४ पासूनच; विक्रम गोखले म्हणाले, माझं मत बदलणार नाही!

मुंबई: देशाच्या स्वातंत्र्याबद्दल () हिनं केलेल्या वक्तव्याचं समर्थन केल्यामुळं वादाच्या भोवऱ्यात अडकलेले अभिनेते () यांनी आज आपली बाजू मांडली. '२०१४ पासून देशाला खरं स्वातंत्र्य मिळालं हे माझं प्रामाणिक मत आहे. मी त्यावर ठाम असून ते बदलणार नाही. मी स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केलेला नाही. मूळ भाषणात मी काय म्हणालो ते दाखवण्यात आलेलं नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला,' असं गोखले यांनी आज स्पष्ट केलं. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुलगी नेहा गोखले ही त्यावेळी त्यांच्यासोबत होती. रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी मी तिला आणलं आहे, असं त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं. '१९४७ साली देशाला मिळालेलं स्वातंत्र्य ही भीक होती, खरं स्वातंत्र्य २०१४ साली मिळालं, असं वक्तव्य कंगनानं अलीकडंच एका कार्यक्रमात केलं होतं. त्यावरून प्रचंड गदारोळ सुरू असतानाच विक्रम गोखले यांनी कंगनाच्या वक्तव्याला दुजोरा दिला होता. त्यामुळं गोखले यांच्यावरही टीकेची झोड उठली. त्यानंतर त्यांनी आज आपल्या भूमिकेचा खुलासा केला. 'कंगनाची दोन वर्षांतली मतं तिची वैयक्तिक आहेत. स्वातंत्र्याबद्दल तिनं व्यक्त केलेल्या मताला तिची वैयक्तिक कारणं आहेत. तिचं समर्थन करताना माझी कारणं वैयक्तिक आहेत. मी तिला ओळखतही नाही. मी केवळ तिच्या म्हणण्याला दुजोरा दिला. तो माझ्या अभ्यासाच्या आधारे दिला. १८ मे २०१४ च्या 'गार्डियन'मध्ये जे लिहिलं गेलंय, तेच कंगना बोलली होती. ती काही चुकीचं म्हणाली नाही एवढंच मी म्हणालो. मी त्या मतावर आजही ठाम आहे. २०१४ पासून जागतिक पटलावर सक्षम उभं राहायला सुरुवात झाली, असं गोखले म्हणाले. मी तोंडफाटका माणूस आहे. मला ओठ शिवता येत नाहीत. त्यामुळंच माझी कुठल्याही राजकीय पक्षाशी बांधिलकी नाही. गेल्या ३० वर्षांत मला अनेक राजकीय पक्षांचे निरोप आले, पण मी गेलो नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. ...तेव्हा शरम वाटली नाही का? कंगनाचं समर्थन करून मी स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला असं म्हणणं चुकीचं आहे. माझ्या मूळ भाषणात मी काय बोललो हे दाखवलं गेलेलं नाही. मी स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला असं कुणाला वाटत असेल तर 'दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल' हे गीत म्हणताना, ज्यांची अवहेलना झाली त्यांचं काय? तेव्हा आपल्याला शरम वाटली नाही का?,' असा सवालही गोखले यांनी केला.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DEwHLe

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.