Type Here to Get Search Results !

'करोनाचं टेन्शन, थोडं मनोरंजन व्हावं म्हणूनच...'; विखेंचा मलिक व राऊतांना टोला

अहमदनगर : सध्या करोना काळात अनेक जण अडचणीत आणि तणावात आहेत. अशा परिस्थितीत लोकांचे घराघरात मनोरंजन व्हावे यासाठी सरकारने मंत्री व खासदार या दोघांना नेमले आहे. त्यामुळे ते दोघे उठसूठ बडबडतात, असा टोला भाजप खासदार डॉ. यांनी लगावला. ( ) वाचा: कर्जत येथे माजी मंत्री यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन डॉ. विखे यांच्या हस्ते झाले. यावेळी विखे बोलत होते. सभा सुरू असतानाच जोरदार पावसाला सुरुवात झाली. भर पावसात सभा घेण्यात आली. त्यामुळे या सभेची आणि नेत्यांच्या टोलेबाजीची चर्चा सुरू आहे. प्रदीर्घ काळानंतर शिंदे यांनी कर्जतमध्ये मोठी सभा घेतली होती. या सभेच्यावेळीच नेमका पाऊस सुरू झाला. सभेला मोठी गर्दी झाली होती. पाऊस सुरू झाला तरीही दोन्ही नेत्यांनी सभा तशीच सुरू ठेवली. आलेले लोकही बसून राहिले. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी सातारा येथील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या पावसातील सभेची आठवण झाली. वाचा: यावेळी बोलताना डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीची भरपाई अजून दिली नाही. त्यामुळे यावर्षी सर्वत्र दिवाळीचा उत्साह असला तरी अहमदनगर जिल्ह्यासाठी विशेषत: कर्जत तालुक्यासाठी यंदा काळी दिवाळी आहे. म्हणूनच आता या सरकारला धडा शिकवण्यासाठी आपण सज्ज झाले पाहिजे. सभेच्यावेळी आलेल्या पावसासंबंधी बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले, 'आज पावसामध्ये भिजण्याचा माझाही नंबर लागला. या सभेच्या माध्यमातून गोदड महाराजांचा आर्शीवाद मिळाला आहे. आगामी काळात नक्कीच सुखद घटना घडतील'. वाचा: यावेळी बोलताना राम शिंदे म्हणाले, 'दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच अशी मोठी जाहीर सभा आयोजित केली आहे. पावसाने व्यत्यय आणला असेही म्हणता येणार नाही. पाऊस आवश्यकच होता. कारण पाणी असूनही वीज नसल्याने आणि वीज कंपनीच्या कठोर धोरणामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही. आपल्या कार्यकाळात आपण सर्वच घटकांसाठी कामे केली. जलयुक्त शिवार सारखी महात्त्वाकांक्षी योजना राबविली. रस्त्यांची कधी झाली नाहीत, अशी कामे केली. तरीही २०१९ च्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले, याचे शल्य आहे, असेही शिंदे म्हणाले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, काका धांडे, अनिल गदादे, दादा सोनमाळी, मनीषा बडे, पप्पू धोदाड, दीपक लांगोरे उपस्थित होते. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Ym4zNk

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.