Type Here to Get Search Results !

अशोक चव्हाणांचे राजकीय वजन वाढले; देगलूर विजयानंतर थेट दिल्लीतून फोन

नांदेड: देगलूर बिलोली मतदारसंघातील () विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसनं दणदणीत विजय मिळवला आहे. काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी भाजपचे सुभाष साबणे यांचा ४१ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला आहे. या विजयामुळं सार्वजनिक बांधकाम मंत्री () यांचं काँग्रेसमधील वजन आणखी वाढलं आहे. देगलूर बिलोली मतदारसंघ अशोक चव्हाण यांच्या जिल्ह्यातील असल्यामुळं या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावरच होती. भाजपनं शिवसेनेच्या माजी आमदाराला फोडून काँग्रेस व पर्यायानं महाविकास आघाडीसमोर मोठं आव्हान उभं केलं होतं. नांदेडमध्ये 'पंढरपूर पॅटर्न'ची पुनरावृत्ती करण्याची घोषणा भाजपनं केली होती. मात्र, चव्हाण यांनी भाजपला 'जशास तसं' उत्तर दिलं. भाजपवासी झालेले स्वत:चे मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर यांना पुन्हा काँग्रेसमध्ये आणलं. तिथंच काँग्रेसचं पारडं जड झालं. त्यानंतरही गाफील न राहता निवडणूक घोषित झाल्यापासून ते नांदेडमध्ये तळ ठोकून होते. अखेर काँग्रेसचा दणदणीत विजय झाला. साहजिकच विजयाचं श्रेय अशोक चव्हाण यांना दिलं जात आहे. वाचा: 'देगलूरच्या विजयानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दूरध्वनी करून विजयी उमेदवार जितेश अंतापूरकर व सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शुभेच्छा दिल्या,' अशी माहिती चव्हाण यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. त्यांनी तिन्ही नेत्यांचे आभार मानले आहेत. 'देगलूर पोटनिवडणुकीतील जितेश अंतापूरकर यांचा दणदणीत विजय ही स्वर्गीय रावसाहेब अंतापूरकर यांना खरी श्रद्धांजली आहे. ४१ हजारांहून अधिक मताधिक्याचा हा विजय काँग्रेस व महाविकास आघाडीवरील महाराष्ट्राच्या विश्वासाचं प्रतीक असून, मतदारांनी भाजपच्या द्वेषमूलक राजकारणाला चपराक लगावली आहे,' असं त्यांनी दुसऱ्या एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे. वाचा: 'आदर्श' प्रकरणात मुख्यमंत्रिपद गमवावे लागलेले अशोक चव्हाण मधल्या काळात पक्षात काहीसे मागे पडले होते. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर मंत्रिपदासाठी त्यांना बरेच प्रयत्न करावे लागल्याचीही चर्चा होती. मात्र, देगलूरमध्ये भाजपचं आव्हान परतावून लावल्यानंतर पुन्हा एकदा चव्हाण प्रकाशझोतात आले आहेत.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Y9CTLu

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.