Type Here to Get Search Results !

तीक्ष्ण हत्याराने वार करून नाशिकमध्ये सराईत गुन्हेगाराचा खून

पंचवटी : नाशिकमध्ये सराईत गुन्हेगाराचा तीक्ष्ण हत्याराने वार करून आणि डोक्यावर दगड टाकून खून झाल्याची घटना रविवारी (दि. २१) रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. प्रवीण गणपत काकड असं या हत्या () झालेल्या गुन्हेगाराचं नाव आहे. म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील म्हसरूळ-आडगाव लिंकरोडवरील रोहिणी हॉटेलसमोरील मोकळ्या भूखंडाच्या भागात हा खून झाला. प्रवीणची काही दिवसांपूर्वी जामिनावर मुक्तता झाली होती. तो शहर पोलीस आयुक्तालयातील कर्मचाऱ्याचा मुलगा होता. खून करणारे संशयित अज्ञात असून, ते तीन ते चार जण असण्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या हत्या प्रकरणाविषयी माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहायक पोलीस आयुक्त मधुकर गावित, म्हसरूळ पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत कुमार सुर्यवंशी आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/32aDxtN

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.