Type Here to Get Search Results !

संवेदनशील अचलपुरात भाजपच्या नेत्यांना केले पोलिसांनी स्थानबद्ध, संचारबंदी लागू

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील अतिसंवेदनशील तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अचलपूर तालुक्यात आज भारतीय जनता पार्टीच्यावतीने शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते. अमरावती शहरांमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी दुपारी उपविभागीय अधिकारी आदेश जारी कळत संपूर्ण उपविभागात कलम १४४ लागू केली. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष एडवोकेट प्रमोद सिंह गड्रेल यांनी शहर बंदचे आवाहन केले होते. कायदा व सुव्यवस्थेची स्थिती लक्षात घेता पोलिस प्रशासनाच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्ष यांसह इतर महत्त्वाच्या नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे अभय माथने रुपेश लहाने श्यामसिंह गड्रेल प्रमोद गड्रेल आदींचा समावेश आहे. स्थानबद्ध करण्यात आलेल्या या नेत्यांना काही तासापूर्वी अमरावती येथे हलविण्यात आले आहे. अतिसंवेदनशील तालुका म्हणून प्रसिद्ध असलेल्या अचलपूर शहरात सध्या पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांनी तळ ठोकला आहे. भारतीय जनता पार्टीच्यावतीने बंद व बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेता पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्व दुकाने बंद ठेवण्याचे कडकडीत आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे करोनानंतर प्रथमच अचलपुर परतवाडा शहरातील रस्ते हे निर्मनुष्य झाले आहेत.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ounQ8b

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.