Type Here to Get Search Results !

'वानखेड़े साहब से बात हुई क्या?'; त्या संभाषणात उल्लेख! नवा गौप्यस्फोट

मुंबई: प्रकरणी अटक करण्यात आलेला अभिनेता याचा मुलगा याला सोडण्यासाठी २५ कोटींची खंडणी मागण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपाची मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून चौकशी सुरू असून या पथकाने आणखी एक पंच साक्षीदार याचा जबाब नोंदवून घेतला आहे. ४ नोव्हेंबर रोजी पगारे याचा जबाब घेण्यात आला असून आज माध्यमांशी बोलताना पगारे याने अनेक गौप्यस्फोट केले आहेत. क्रूझवरील छापा पूर्वनियोजित होता आणि शाहरुख खानच्या मुलाला यात पद्धतशीरपणे गोवण्यात आले, असा दावा पगारेने केला आहे. एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक यांच्याबाबतही पगारे याने महत्त्वाची माहिती दिली. ( ) वाचा: क्रूझ ड्रग्ज पार्टीवरील छापा व आर्यन खानची अटक याबाबत सातत्याने धक्कादायक माहिती पुढे येत आहे. या प्रकरणात आर्यनच्या सुटकेसाठी खंडणी मागण्यात आली होती, असा दावा सर्वप्रथम प्रभाकर साईल या पंच साक्षीदाराने केला होता. तसे प्रतिज्ञपत्रच त्याने सादर केले होते. गंभीर बाब म्हणजे या डीलमध्ये ८ कोटी रुपये समीर वानखेडे यांना दिले जाणार होते, असा साईल याचा आरोप आहे. याबाबत एनसीबीचं विशेष तपास पथक चौकशी करत असून दुसरीकडे मुंबई पोलिसांचं विशेष तपास पथकही याचा तपास करत आहे. वाचा: मुंबई पोलिसांच्या एसआयटीने आधीच प्रभाकर साईल याचा जबाब नोंदवून घेतला असून आता विजय पगारे या साक्षीदाराचाही जबाब नोंदवला गेला आहे. पगारे हा धुळ्यातला आहे. पगारे याने आज माध्यमांशी बोलताना अनेक गौप्यस्फोट केले आहेत. या प्रकरणात शंभर टक्के आर्यन खानला गोवलं गेलं आहे. हा सारा कट सुनील पाटील, किरण गोसावी, मनीष भानुशाली आणि सॅम डिसूझा यांचा होता, असा दावा करत पगारे याने सारा घटनाक्रम सांगितला आहे. विशेष म्हणजे सुनील पाटील याने रेल्वेशी संबंधित कंत्राट मिळवून देण्याचं आमिष दाखवून आपल्याकडून २० लाख रुपये घेतल्याचा पगारे याचा आरोप आहे. हे पैसे वसूल करण्यासाठीच मी काही दिवस पाटीलसोबत होतो, असे पगारेचे म्हणणे आहे. वाचा: आर्यन खानला सोडण्यासाठी जे डील पक्के झाले होते त्यात समीर वानखेडे यांचा सहभाग होता का, असे विचारले असता पगारे याने मनीष भानुशालीच्या बोलण्याचा संदर्भ दिला. मनीष भानुशाली याच्या संभाषणात एकदोन वेळा समीर वानखेडे यांच्या नावाचा उल्लेख आला. 'वानखेड़े साहब से बात हुई थी क्या?', असे तो फोनवर समोरच्या व्यक्तीला विचारत होता, असे पगारे म्हणाला. किरण गोसावी याने आर्यनबरोबर जो सेल्फी काढला त्यामुळेच या सर्वांची गोची झाली व डील फिसकटल्याचा दावाही पगारे याने केला आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3mQug27

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.