Type Here to Get Search Results !

भरधाव बीएमडब्लूचा दुभाजकाला धडकून भीषण अपघात; दोन तरुण जखमी

पुणे: म्हात्रे पुलाजवळील डी. पी. रस्त्यावर रात्रीच्या सुमारास भरधाव बी. एम. डब्लू या गाडीचा दुभाजकाला धडकून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. () एक बीएमडब्लू भरधाव वेगाने डीपी रोडकडे जात होती. गाडी म्हात्रे पुल परिसरात येताच दुभाजकाला धडकून हा अपघात झाला आहे. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. हा अपघात मध्यरात्री २.३० ते ३.३० च्या दरम्यान झाला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वाचाः अपघात झाला त्यावेळी गाडीत दोन तरुण होते. या दोन्ही तरुणांचे पाय लेग रुममध्ये अडकले होते. अग्निशमन दलाच्या मदतीने या दोन्ही तरुणांना गाडीतून बाहेर काढण्यात आले व त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाचाः दरम्यान, हा अपघात इतका भीषण होता की गाडीच्या समोरच्या भागाचे पूर्णपणे नुकसान झालं आहे. गाडी दुभाजकाला धडकल्याने गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Fnh3Eb

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.