Type Here to Get Search Results !

'गोळ्या घाला, फाशी द्या पण आम्ही आंदोलनावर ठाम', निलंबित एसटी कामगारांचा सरकारला इशारा

लातूर : राज्यात ३६ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली पण गेंड्याच्या कातडीच्या सरकारला जाग आली नाही. उलट राज्यातील ३७६ एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. आता तुम्ही आम्हाला सेवा मुक्ती द्या, गोळ्या घाला, हवं तर फाशी द्या पण आम्ही आंदोलनावर ठाम आहोत. अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलनकर्त्या निलंबित एसटी कर्मचाऱ्यांनी दिली आहे. सरकार आमच्यावर रोज वेगवेगळ्या कारवाया करून आमचं लोकशाही मार्गाने चाललेलं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे. पण आमचं सरकारला एकच सांगणं आहे, आम्हाला चिडायाला भाग पाडू नका. एकदा का एसटी कर्मचारी चिडला की तुमच्या खुर्च्या कुठं जातील कळणार पण नाही, तुम्हाला पळताभुई थोडी होईल. मंत्र्यांना, आमदारांना रस्त्यावर फिरकुही देणार नाहीत हे लक्षात ठेवा. एसटी कर्मचाऱ्यांनी न्याय मागण्यासाठी आंदोलन करत आहेत, सरकारने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करत दडपशाही करण्याचं काम करत आहे. पण भाजपा या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे, ही निलंबनाची कारवाई परत घेतली नाही तर भाजपा तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा भाजपचे जोतीराम चीवडे यांनी दिला. राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी गेल्या १४ दिवसापासून एसटी कामगारांनी संपाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे राज्यातील ३७६ एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यात लातूर विभागातील ३२ कर्मचारी निलंबित झाले आहेत.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/309fY3u

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.